Kaali Controversy: 'तुझी एवढी हिंमत! लीना मणिमेकलाईवर शक्तिमान भडकला |Kali Poster controversy shaktiman fame Mukesh Khanna | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kaali poster news

Kaali Controversy: 'तुझी एवढी हिंमत! लीना मणिमेकलाईवर शक्तिमान भडकला

Kaali Poster Controversy: दिग्दर्शक, निर्माता म्हणून सध्या प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या लीना मणिमेकलाईवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. (social media news) तिनं तिच्या एका चित्रपटातून हिंदु देवतांचा अपमान केल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी लीना मणिमेकलाईनं तिच्या काली नावाच्या चित्रपटाचं पोस्टर व्हायरल केलं होतं. त्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात (viral news) सापडली होती. तिच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून टीका झाली होती. आता प्रख्यात अभिनेते शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

मुकेश खन्ना हे त्यांच्या परखड मतांसाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहे. (Mukesh khanna) समाजातील अनेक गोष्टींवर ठामपणे मतप्रदर्शन करणारे कलावंत म्हणून सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांना फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मुकेश खन्ना यांनी लीना मणिमेकलाईवर तोफ डागली आहे. ते म्हणाले, तिला काही बोलण्याची शिस्त नाही. अशाप्रकारे आपली कलाकृती सादर करुन तिला काय साध्य करायचे आहे, मला ती हिंदू आहे की मुस्लिम याविषयी माहिती नाही. मात्र तिनं जे केलं ते चूकीचे आहे.

काली नावाच्या माहितीपटावरुन हा वाद सुरु झाला आहे. त्याची निर्मिती आणि लीनानं केली आहे. त्याचे पोस्टर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. त्यात हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला होता. अशी चर्चा सोशल मीडियावर होती. त्यामुळे लीना वादाच्या भोवऱ्यात सापडली. यावरुन तिला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या. यासगळ्यात महाभारतात भीष्म पितामह यांची भूमिका करणारे आणि शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांच्या प्रतिक्रियेनं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा: Viral Photo: हॉस्पिटलमध्ये सोनमच्या कुशीत चिमुकलं बाळ, अभिनेत्री आई बनली?

खन्ना म्हणाले, लीनाची एवढी हिंमत झालीच कशी, अशा निर्मात्यांवर बंदी घालण्याची गरज आहे. त्यांनी आपली कलाकृती चर्चेत राहावी यासाठी काहीही करण्याचा प्रयत्न करु नये असे मला वाटते. यापूर्वी मुकेश खन्ना यांनी युट्यूबवरुन यांनी लीना मेकलाईवर निशाणा साधला होता.

हेही वाचा: Video: आपल्याला दोन्ही हातच नसेल तर?...

Web Title: Kali Poster Controversy Shaktiman Fame Mukesh Khanna Angry On Leena Manimekalai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top