वयाच्या नवव्या वर्षी कल्कीचं लैंगिक शोषण; मुलाखतीत झाली व्यक्त | Kalki Koechlin | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kalki Koechlin

वयाच्या नवव्या वर्षी कल्कीचं लैंगिक शोषण; मुलाखतीत झाली व्यक्त

अभिनेत्री कल्की कोचलीनने (Kalki Koechlin) बॉलिवूडमध्ये आपलं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. महिला सबलीकरण किंवा वेगळ्या धाटणीच्या चित्रपट निवडीबद्दल बोलताना ती अनेकदा स्पष्टवक्तेपणा ठेवते. 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या एका मुलाखतीत कल्कीने बालवयात झालेल्या लैंगिक शोषणाबद्दलचं वास्तव सांगितलं होतं. याबद्दल सांगताना इतरांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल याचा अजिबात विचार करत नसल्याचं तिने या मुलाखतीत मोकळेपणानं सांगितलं.

काय म्हणाली कल्की?

"बालवयात माझ्यावर लैंगिक शोषण झाल्याची घटना सांगण्याचा हा उद्देश नाही की इतरांनी मला सहानुभूती दाखवावी. तसा विचार करणं एक स्त्री म्हणून योग्य ठरणार नाही. अशा प्रसंगांना सामोरं गेलेल्या माझ्यासारख्या इतर महिलांनाही बिनदिक्कतपणे बोलण्याचा धाडस यावा हा यामागचा मूळ उद्देश आहे. जेव्हा ती घटना घडली, त्यावेळी मला माझीच चूक असल्याचं वाटत होतं. त्यामुळे मी आईला त्याबद्दल सांगण्यास घाबरले आणि गप्प बसले. तेव्हाच जर मी धाडस केलं असतं, तर आज गोष्ट वेगळी असती. मूळात 'सेक्स' या शब्दाविषयी जी गूढता आहे, ती पालकांनी नाहीशी केली पाहिजे. जेणेकरून मुलांना त्या विषयावर मोकळेपणानं बोलता येईल आणि लैंगिक शोषणाच्या घटनांना आळा बसेल", असं ती म्हणाली.

हेही वाचा: हृता-प्रतीकची नवी सुरुवात.. साखरपुड्याचे खास फोटो

कल्कीने २०११ मध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपशी लग्न केलं. 'देव डी' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. मात्र लग्नाच्या दोन वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये कल्कीने प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं होतं. बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गला ती डेट करत असून लग्नाआधी ती गरोदर होती. २०२० मध्ये तिने मुलीला जन्म दिला. गाय आणि कल्की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असून त्यांनी अद्याप लग्न केलं नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top