actor kamal khan
actor kamal khan Team esakal

'मुस्लिमांसाठी भारत सुरक्षितच, अफगाणिस्तानातून लोकं यायला सुरुवात'

मुंबई - बॉलीवूडमध्ये bollywood असे काही सेलिब्रेटी आहेत जे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत असतात. अभिनेत्री कंगना राणावत kangana ranaut , स्वरा भास्कर swara bhaskar, गीतकार जावेद अख्तर javed akhatar, फरहान अख्तर आणि केआरके अर्थात कमाल खान krk alias kamal rashid khan यांची याबाबत नावं सांगता येतील. ही अशी मंडळी आहेत ज्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी कुठलाही विषय वर्ज्य नाही. आता केआरके त्याच्या आणखी एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं बॉलीवूडच्या भाईजानशी पंगा घेतला होता. त्यामुळे त्याच्यावर न्यायालयातही तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र केआरकेची वादग्रस्त वक्तव्ये सुरुच आहेत. त्यानं अफगाणिस्तानातून जी लोकं स्थलांतर करत आहेत त्यांच्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या जगभर चर्चेत असणारा विषय हा अफगाणिस्तानचा आहे. तालिबान्यांनी हा देश आपल्या ताब्यात घेतला आहे. तिथल्या महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले असुरक्षित असल्याची चर्चा आहे. ते आश्रयासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये स्थलांतर करत असल्याचे दिसून आले आहे. भारतातही अनेक नागरिकांनी यायला सुरुवात केली आहे. त्यावर कमाल खाननं आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं अफगाणिस्तानातील लोकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तो म्हणतो, सध्या त्या देशामध्ये जे काही चालले आहे ते गंभीर आहे. त्या देशातील मुस्लिमांची आपल्याला काळजी वाटते. त्यापुढे तो म्हणतो, भारत हा असा देश आहे की, जिथे मुस्लिमांना कोणताही धोका नाही. त्यांच्यासाठी सर्वात सुरक्षित असलेला देश म्हणून आपल्याला भारताचे नाव घेता येईल. अशी प्रतिक्रिया कमाल राशिद खाननं दिली आहे.

actor kamal khan
अभिनेता कमाल खान पुन्हा झाला ट्रोल; वाचा नेमकं काय केलंय त्याने....
actor kamal khan
ती पुन्हा आली, शिल्पा शेट्टी पुन्हा 'सुपर डान्सच्या सेटवर'

आता अफगाणिस्तानातील मुस्लिमांनी भारतात यायला सुरुवात केली आहे. मी जे काही बोलतो त्याविषयी ठाम आहे. भारत हा शांतताप्रिय देश आहे. या देशांमध्ये मुस्लिमांना कोणताही धोका नाही. अफगाणिस्तानातून मोठ्या संख्येनं नागरिकांनी वेगवेगळ्या देशांमध्ये स्थलांतर करायला सुरुवात केली आहे. असे असताना त्यांना भारताविषयी जे आहे ते सांगणं महत्वाचं आहे. अफगाणिस्तानातील मुस्लिम बांधव भारतात येत आहेत. त्याचे कारण त्यांना भारतात मुस्लिमांची काय स्थिती आहे याबद्दल माहिती आहे. असेही कमाल खाननं म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com