Kamal Haasan : 'त्याला पाहिलं अन् मला माझे जुने दिवस आठवले'! कमल हासननं बॉलीवूडच्या कोणत्या अभिनेत्यांच केलं कौतुक?

मनोरंजन विश्वात सध्या एका चित्रपटानं प्रेक्षकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.
Kamal Haasan south superstar prasied Pippa Ishaan Khatter
Kamal Haasan south superstar prasied Pippa Ishaan Khatteresakal

Kamal Haasan south superstar prasied Pippa Ishaan Khatter :

मनोरंजन विश्वात सध्या एका चित्रपटानं प्रेक्षकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. तो चित्रपट पाहिल्यावर साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याला कमल हासनला देखील त्या अभिनेत्याचे कौतुक करावे लागले आहे. सध्या कमल हासनची प्रतिक्रिया चर्चेत आहे. तो चित्रपट आहे पिपा.

ओटीटीवर १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या पिपाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. त्यातील कलाकारांच्या परफॉर्मन्सचे कौतुक होत आहे. त्याला मिळालेला प्रतिसादही चांगला आहे. अशावेळी त्यातील अभिनेता इशान खट्टरचं नेटकऱ्यांकडून, चाहत्यांकडून कौतुक होताना दिसत आहे. आता प्रसिद्ध अभिनेता कमल हासनकडून देखील त्याला शाबासकी मिळाली आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

पिपा पाहिल्यानंतर कमल हासननं दिलेली प्रतिक्रिया इशानविषयी खूप काही सांगून जाणारी आहे. इशान हा एक गुणी कलाकार असून मी ज्यावेळी त्याचा हा चित्रपट पाहिला तेव्हा मला माझे जुने दिवस आठवले. त्यानं पिपामध्ये चांगले काम केले आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अशा शब्दांत कमल हासननं त्याचं कौतुक केलं आहे.

मी जेव्हा इशानच्या वयाचा होतो त्यावेळी माझे चित्रपट आणि त्यातील भूमिका देखील अशाच प्रकारच्या होत्या. आता पिपा पाहिल्यावर मला पुन्हा त्या दिवसांची आठवण आली आहे. या चित्रपटाच्या पूर्ण टीमचे कौतुक करायला हवे. क्रु नं घेतलेली मेहनत पडद्यावर जिंकून घेते.

Kamal Haasan south superstar prasied Pippa Ishaan Khatter
Pippa Actor Anuj Singh Duhan : 'सैन्यातील लोकांना...' पिपाच्या अभिनेत्यानं दिली परखड प्रतिक्रिया

पिपामध्ये इशाननं कॅप्टन बलराम सिंह मेहताची भूमिका साकारली असून त्या भूमिकेचे सोशल मीडियावर देखील कौतुक होत आहे. कमल हासननं म्हटलं आहे की, बल्ली ते कॅप्टन बलराम सिंह मेहतापर्यंतचा त्याचा प्रवास पाहून प्रभावित झालो. मला त्याचे कौतुक वाटते. कमाल केली आहे त्यानं. पिपाच्या पूर्ण टीमला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. अशा शब्दांत कमल हासननं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कमल हासनच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तो ठग लाईफमध्ये दिसणार आहे. यापूर्वी कमल हासनच्या विक्रम या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानं बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई केली होती. ठग लाईफचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी केले असून त्यांच्या पीएस १ आणि पीएस २ ला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. ठग लाईफचा प्रोमो चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये पोंगल सणाच्या निमित्तानं प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com