आमिर खान सच्चा देशभक्त; बायको सोडली पण देश नाही सोडला: KRK | Amir Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AMIR KHAN
आमिर खान सच्चा देशभक्त; बायको सोडली पण देश नाही सोडला: KRK | Amir Khan

आमिर खान सच्चा देशभक्त; बायको सोडली पण देश नाही सोडला: KRK

बॉलिवूड अभिनेता मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान त्याच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटामुळे दिवसांपासून चर्चेत आहे. आमिर खानच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आमिर खान सोशल मीडियापासून दूर राहतो. परंतु अभिनेता आणि समीक्षक कमाल रशीद खानने ट्विटरवर आमिर खानला टोमणे मारले आहेत. हे वादग्रस्त ट्वीट सध्या चर्चेत आहे. (Kamal Khan critics Amir Khan on Twitter)

हेही वाचा: Video :काश्मीर फाईल्सचं आमिर खान कडून कौतुक

काय आहे केआरकेचे ट्विट-

केआरके वादग्रस्त ट्वीट्समुळे सतत चर्चेत असतो. आता त्याने आमिर खानची खिल्ली उडवणारा ट्वीट केलं आहे. तो म्हणतो की, 'आमिर खानने आपण खरा देशभक्त असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांची पत्नी म्हणाली होती की, मला या देशात भीती वाटते. देश सोडून जाऊ. भावाने पत्नीला सोडले, पण देश सोडला नाही.

या ट्विटमध्ये केआरकेने हसणारा इमोजीही तयार केला आहे. केआरकेच्या या ट्विटवर सोशल मीडिया यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जण त्याला कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात कमेंट करू नका असे सांगत आहेत, तर काहीजण कमेंट सेक्शनमध्ये आमिरला ट्रोल करत आहेत.

हेही वाचा: आमिर खान-फातिमाच्या लग्नाचा फोटो व्हायरल; जाणून घ्या सत्य..

द काश्मीर फाइल्सवर आमिरची प्रतिक्रिया-

अलीकडेच आमिर खान विवेक अग्निहोत्रीच्या द काश्मीर फाइल्सवरील प्रतिक्रियेमुळे चर्चेत होता. एका पत्रकार परिषदेदरम्यान आमिर खानने सांगितले की, त्याने काश्मीर फाइल्स पाहिला नाही, पण लवकरच पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. काश्मिरी पंडितांबाबत जे काही झाले ते दुःखद आहे. प्रत्येक भारतीयाने पाहावा असा हा चित्रपट आहे.

आमिर खानने दोन लग्न केले होते-

3 जुलै 2021 रोजी आमिर आणि किरणने एका पोस्टद्वारे त्यांच्या विभक्त झाल्याची माहिती दिली होती. किरण रावशी आमिर खानचे दुसरे लग्न झाले होते. किरणच्या आधी आमिरचे लग्न रीना दत्ताशी झाले होते. लग्नाच्या 16 वर्षानंतर 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आमिरला रिना दत्तासोबत मुलगी इरा आणि मुलगा जुनैद आहे.

Web Title: Kamal Khan Critics Amir Khan On Twitter

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top