KRK : तुरुंगात १० दिवस केवळ पाणी पिऊन जगलो, वजन घटले; केआरकेचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

krk

KRK : तुरुंगात १० दिवस केवळ पाणी पिऊन जगलो, वजन घटले; केआरकेचा दावा

KRK Claims He Was Surviving Only On Water In Jail : कमाल आर खान अर्थात केआरके (KRK) नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याला मुंबई (Mumbai) विमानतळावरुन जुन्या ट्विट प्रकरणी अटक करण्यात आली होती. काही दिवस तुरुंगात राहिल्यानंतर केआरकेला जामीन मिळाले.

परतल्यानंतर त्याचे एक ट्विट पुन्हा चर्चेत आले आहे. केआरके आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, १० दिवस तुरुंगात केवळ पाणी पिऊन जगलो. त्यामुळे १० किलो वजन कमी झाले आहे.

हेही वाचा: Brahmastraचा विश्वविक्रम, जगातील चित्रपटांना बाॅलीवूडच्या सिनेमाने टाकले मागे

यावर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना केआरकेच्या दाव्यावर विश्वास ठेवायलाच नकार दिल्याचे दिसते. एक युजर म्हणाला, सर तसेही तुम्ही २० किलोचेच दिसता. अरे सर तुम्ही मुंबईला का गेला, असा प्रश्न दुसऱ्या युजरने विचारला. १० दिवसांत १० किलो वजन कसे कमी होऊ शकते अशा शब्दांत दुसऱ्या एका युजरने आश्चर्य व्यक्त केले.

हेही वाचा: Brahmastra : 'ब्रह्मास्त्र' ने मोडले सात मोठे रेकाॅर्ड्स, जाणून घ्या कोणते

काही केआरकेला चित्रपट समीक्षा करण्यास सांगत आहेत. तसेच रणबीर कपूर आणि आलिया भटचा ब्रह्मास्त्रची समीक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Kamal Rashid Khan Krk Claims He Was Surviving Only On Water In Jail

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..