esakal | कंगणा म्हणते, '' सावरकरांप्रमाणे मलाही तुरुंगात टाका'' 
sakal

बोलून बातमी शोधा

Kananga twitted now government send me in to the prison like savarkar

मला सातत्याने प्रशासनाकडून त्रास देण्यात आला आहे. ज्या कारणासाठी सावरकरांना विद्रोहासाठी जेलमध्ये टाकण्यात आले होते तसेच मलाही आता जेलमध्ये पाठविण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

कंगणा म्हणते, '' सावरकरांप्रमाणे मलाही तुरुंगात टाका'' 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कंगणा काय बोलेल आणि काय नाही याचा अंदाज येणे कठीण आहे.  गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. ती अशाप्रकारची वक्तव्ये का करते हे तर काही कळायला मार्ग नाही. तिच्या वक्तव्यांमागचा बोलविता धनी कोण आहे याविषयी मतमतांतरे आहेत. यावरुनही राजकारण होऊ लागले आहे. आता दोन ते तीन दिवसांपूर्वी तिने शिवसेनेला पप्पुसेना म्हणून डिवचले होते. कायम वादाला सामो-या जाव्या लागलेल्या कंगणाचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

कंगणाने आता स्वताची तुलना सावरकरांशी केली आहे. तिने आपण करीत असलेले काम जर चुकीचे असल्यास त्याची शिक्षा द्यावी. यासाठी मी तयार आहे. ज्य़ाप्रमाणे राणी लक्ष्मीबाईचे घर तोडले तसे माझेही घर तोडण्यात आले. मला सातत्याने प्रशासनाकडून त्रास देण्यात आला आहे. ज्या कारणासाठी सावरकरांना विद्रोहासाठी जेलमध्ये टाकण्यात आले होते तसेच मलाही आता जेलमध्ये पाठविण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. 'इंटॉलरन्स गँग से जाके कोई पूछे कितने कष्ट सहे हैं उन्होंने ने इस इंटॉलरंट देश में?' असे विधान कंगणाने व्टिट करुन मोठी खळबळ उडवून दिली आहे. या तिच्या विधानावरुन तिला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.

एवढ्यावरच कंगणा थांबवलेली नाही तर तिने आपला छळ करणा-या प्रशासनाला धारेवर धरले आहे. त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मी सावरकरांसारख्या व्यक्तिंची पूजा करते. तसेच मला नेताजी सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी हे वंदनीय आहेत. सध्या मला प्रशासन सातत्याने तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचे कारण म्हणजे मी माझ्या मतावर ठाम असणे हे आहे. त्यामुळे आता मी तुरुंगात जाण्यासाठी तय़ार आहे. त्या क्षणाची वाट पाहत आहे. अशा आशयाचे व्टिट कंगणाने केले आहे.

याअगोदर कंगणाने   हिंदी चित्रपटसृष्टीसाठी जो बॉलीवूड शब्द वापरला गेला आहे त्याविरोधात कंगणाने भूमिका घेतली आहे. यासाठी तिने एक नवीन हॅशटॅग सुरु केला  होता. या बॉलीवूडमध्ये जे काय चालते ते जगासमोर आणण्यासाठी ती आक्रमक झाली  होती. बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टात धाव घेतली आहे.  रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात काही बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे.  या कृतीवर अभिनेत्री कंगनाने राग व्यक्त केला. यावर तिने ट्विट करुन 'त्यात आता कळलं का संपूर्ण जगासमोर इभ्रतीचे वाभाडे निघाल्यावर कसं वाटतं?' असा सवाल याचिका दाखल करणा-यांना तिने विचारला होता. 

आता कंगणाने India Reject Bollywood हॅशटॅग सुरु केला.आपल्याला हा बॉलीवूड शब्दच आवडत नसल्याचे म्हटले आहे. हा शब्द अपमानकारक  आहे. त्याचे समर्थन करणा-यांचा निषेध केला. विशेष म्हणजे कंगणाच्या या नव्या मोहिमेला अनेकांचा पाठींबा मिळाला. बॉलीवूडमध्ये कलाकार आहेत आणि दलाल देखील तसेच याठिकाणी चित्रपट इंडस्ट्री आहे आणि बॉलीवूडही. ज्या मोठ्या दिमाखात आपण बॉलीवूड असे म्हणतो तो शब्दही हॉलीवूड यावरुन चोरल्याचे तिने म्हटले होते.