खोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही'; कंगनाला शिवसेना नेत्याने मारला टोला

सुस्मिता वडतिले 
Sunday, 6 September 2020

एखाद्या खोट्या घोडयावर बसून आणि दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेले स्क्रिप्ट वाचून कधीच कोणी झाशीची राणी होत नाही, असे शिवसेना नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी अभिनेत्री कंगना राणावतवर टिका करून ट्वीट केलं आहे.

मुंबई : एखाद्या खोट्या घोडयावर बसून आणि दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेले स्क्रिप्ट वाचून कधीच कोणी झाशीची राणी होत नाही, असे शिवसेना नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी अभिनेत्री कंगना राणावतवर टिका करून ट्वीट केलं आहे. 

 

त्यासाठी कर्मभूमीवर खरी निष्ठा आणि श्रद्धा असावी लागते. जी झाशीच्या राणीनी अखेरपर्यंत जोपासली. कुणालाही राणीची उपमा देऊन झाशीच्या राणीचा अपमान करण्यात काही राम नाही. 

अभिनेत्री कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. तिच्या या बोलण्यावर प्रचंड वाद निर्माण झाला. यावेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आपल्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारला अपयश आले आहे.

हे अपयश झाकण्यासाठी सरकार हा अभिनेत्री कंगना राणावतचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे. तसेच कंगना राणावतची चर्चा करण्यापेक्षा तसेच या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यापेक्षा सरकारने कोरोनावर लक्ष देण्याची सध्या अत्यंत गरजेचे आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana has been told by Aadesh Bandekar that no one becomes the queen of Jhansi when he sits on a false horse