पंजाबमध्ये कंगना रणौतच्या गाडीला जमावाने घेरलं

"घटनास्थळी पोलीस नसते तर त्यांनी उघडपणे मॉब लिंचिंग केलं असतं," कंगनाने व्यक्त केला राग
Kangana Ranaut
Kangana RanautInstagram
Updated on

अभिनेत्री कंगना रणौतला Kangana Ranaut पंजाबमधून Punjab प्रवास करताना तिथल्या लोकांच्या निषेधाला सामोरं जावं लागलं. कंगनाच्या गाडीला जमावाने घेरलं असून त्याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. कंगना हिमाचलहून निघाली होती. फ्लाइट रद्द झाल्यामुळे ती पंजाबला पोहोचली होती. यावेळी स्वत:ला शेतकरी म्हणणाऱ्या जमावाने माझ्या गाडीला घेरलं आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं कंगना या व्हिडीओत म्हणतेय.

काय म्हणाली कंगना?

"या जमावाकडून मला शिवीगाळ केली जात आहे आणि मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या देशात अशा प्रकारचे मॉब लिंचिंग उघडपणे होत आहे. मला जर सुरक्षा पुरवली नसती तर काय झालं असतं? ही परिस्थिती अविश्वसनीय आहे. इथे पोलिसांची टीम असूनसुद्धा जमाव माझ्या गाडीला पुढे जाऊ देत नाहीये. मी राजकारणी आहे का? लोकांचं हे वर्तन अविश्वसनीय आहे. माझ्या नावाचा वापर करून अनेकजण राजकारण करत आहेत आणि त्याचाच परिणाम ही परिस्थिती आहे. जर घटनास्थळी पोलीस नसते तर त्यांनी उघडपणे लिंचिंग केलं असतं. या लोकांना लाज वाटली पाहिजे", अशा शब्दांत कंगनाने राग व्यक्त केला.

Kangana Ranaut
'बिग बॉस मराठी ३'चा ग्रँड फिनाले पुढे ढकलणार?

कंगनाने शीखांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून तिला ट्रोल केलं गेलं. कंगनाने तिला धमक्या देणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला असून सोनिया गांधी यांना पंजाब सरकारला याबाबत कारवाई करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली होती. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. 'मी कधीही कोणत्याही जात, धर्म किंवा गटाबद्दल अपमानास्पद किंवा द्वेषपूर्ण काहीही बोलले नाही. मी काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी यांना आठवण करून देऊ इच्छिते की, तुम्ही देखील एक महिला आहात, तुमच्या सासू इंदिरा गांधीजी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत या दहशतवादाविरुद्ध जोरदार लढा दिला. कृपया तुमच्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना अशा दहशतवादी, विघटनकारी आणि देशविरोधी शक्तींकडून येणाऱ्या धमक्यांवर त्वरित कारवाई करण्याची सूचना द्या', असं लिहिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com