Kangana Viral Post : 'काय मुर्खपणा चालवलाय? एखाद्या तरुणीला दरवेळी नव्या पुरुषासोबत...' कंगना प्रचंड संतापली!

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना ही आता चांगलीच संतापल्याचे दिसत आहे. त्याला कारणही तसेच आहे.
Kangana Ranaut Angry post Rubbishes Rumors
Kangana Ranaut Angry post Rubbishes Rumors

Kangana Ranaut Angry post Rubbishes Rumors : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना ही आता चांगलीच संतापल्याचे दिसत आहे. त्याला कारणही तसेच आहे.तिच्या नावाची होणारी बदनामी आणि तिचे नाव दर काही दिवसांनी एका सेलिब्रेटीशी जोडले जाणे यामुळे कंगनाचा संताप झाला आहे. तिनं आता तिला ट्रोल करणाऱ्यांना आणि तिच्याविषयी बोलणाऱ्यांना चांगलेच झापले आहे.

राम मंदिराच्या उद्घघाटन सोहळ्याला कंगना उपस्थित होती, यावेळी तिनं शेयर केलेले फोटो आणि व्हिडिओ चर्चेत आले होते. कंगनानं राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होताच केलेली घोषणाबाजी, तिचा तो आवेश, जोश चाहत्यांच्या चर्चेचा विषय होता. कंगनानं काही दिवसांपूर्वी अयोध्येतील काही मंदिरांमध्ये जाऊन स्वच्छताही केली होती. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.

आता कंगनानं इंस्टावर खास पोस्ट शेयर करुन त्यातून तिला दरवेळी तिच्या वैयक्तिक आयुष्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना खडसावले आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाचा एका मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो कंगनाचा बॉयफ्रेंड आहे अशी अफवा पसरली होती. त्यानंतर कंगनानं त्यावर स्पष्टीकरण देणारी पोस्ट शेयर केली होती. मी एका सलूनमध्ये गेली होती. तिथला तो व्यक्ती होता. तो माझा मित्र आहे. असे तिचे म्हणणे होते.

 Kangana Ranaut Angry post Rubbishes Rumors
Kangana Ranaut Angry post Rubbishes Rumors

कंगनाची सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट आणि तिनं व्यक्त केलेल्या भावना किती टोकदार आहेत हे दिसून येईल. कंगनाचा आणि ईझी माय ट्रीपचे मालक निशांत पित्ती यांचा एकत्रित फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोवरुन कंगनाला ट्रोल करण्यात आले होते. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना सुरुवातही झाली होती. यावर कंगनानं पोस्ट शेयर करुन प्रतिक्रिया दिली आहे.

कंगना तिच्या त्या पोस्टमध्ये म्हणते, हा काय मुर्खपणा सुरु आहे मला माहिती नाही. दरवेळी माझं नाव एखाद्या नव्या पुरुषासोबत जोडलं जात आहे. तुम्ही ज्यांचे कुणाचे नाव घेता त्यांच्या आणि माझ्यासाठी ही किती अपमानकारक आणि वाईट गोष्ट आहे याचे भान नेटकऱ्यांना नसते. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया असे करु नये.

Kangana Ranaut Angry post Rubbishes Rumors
Manoj Bajpayee : मनोज वाजपेयीच्या 'The Fable' ने रचला इतिहास! तब्बल ३० वर्षानी बर्लिन चित्रपट महोत्सवात मिळाली 'ती' संधी

पित्ती हे विवाहित आहेत. मग तुम्ही त्यांच्या वरुन मला का डेट करत आहात. मी माझ्या नात्याविषयी तुम्हाला वेळ येईल तेव्हा सांगेल. यावरुन कंगनानं परखडपणे तिची प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. कंगनाची ती पोस्ट जोरदार व्हायरल झालेली दिसत आहे.

मी माध्यमातील काही व्यक्तींना देखील विनंती करते की, त्यांनी कोणत्याही प्रकारे चुकीची माहिती प्रसारित करु नये. तुम्ही पित्ती यांच्याविषयी बोलत आहात पण ते विवाहित आहेत. मी तर दुसरं कुणाला डेट करत आहे. थोडा वेळ थांबा आम्हाला त्रास देऊ नका. मी वेळ आल्यावर त्या नावाचा खुलासा करेलच. असे कंगनानं म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com