रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विक्की कौशल ड्रग टेस्ट करा

संतोष भिंगार्डे
Wednesday, 2 September 2020

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांना सुचवले आहे की, त्यांनी ड्रग्सची रक्त तपासणी केली पाहिजे आणि त्यांच्या व्यसनाधीनतेच्या पसरलेल्या अफवा थांबवल्या पाहिजेत.

मुंबई: सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना रनौतने बॉलिवूड स्टार्सवर निशाणा साधत अनेकांवर वेगवेगळे आरोप केले आहेत. आता नुकतीच कंगनाने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी मादक पदार्थाचे सेवन करीत असतात, असे ती उघडपणे बोलली आहे. आता तिने ट्विटरवर नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये  ड्रग्स सेवनाबद्दल बोलत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांना सुचवले आहे की, त्यांनी ड्रग्सची रक्त तपासणी केली पाहिजे आणि त्यांच्या व्यसनाधीनतेच्या पसरलेल्या अफवा थांबवल्या पाहिजेत. तिने लिहिले, “मी रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विकी कौशल यांना विनंती करते की त्यांनी ड्रग तपासणीसाठी त्यांच्या रक्ताचा नमुना द्यावा. 

सध्या अशी अफवा पसरली आहे की ते कोकेनच्या आहारी गेले आहेत. त्यांनी या अफवा खोट्या ठरवाव्यात असे मला वाटते. या तरुणांचे सँपल्स क्लीन निघाले तर ते लाखाेंची प्रेरणा ठरतील.' असे म्हणते तिने पंतप्रधान कार्यालयालही टॅग केले आहे. कंगनाच्या या ट्विटवर काही जणांनी तिला पाठिंबा दिला आहे तर काही जणांनी तिच्यावर टिका केली आहे. एकूणच कंगनाच्या या ट्विटला संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranaut asks Ranveer Singh Ranbir Kapoor Ayan Mukherjee Vicky Kaushal to do drug test