Kangana Ranaut Post : लोकसभेच्या तयारीचा काय संबंध? जावेद अख्तरांपाठोपाठ कंगनाची 'अ‍ॅनिमल' वर जळजळीत टीका

ज्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल ८५० कोटींची कमाई केली त्या अॅनिमलच्या वाट्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
Kangana Ranaut Bollywood Actress react
Kangana Ranaut Bollywood Actress reactesakal

Kangana Ranaut Bollywood Actress react in Ranbir Kapoor : बॉलीवूडची सर्वाधिक चर्चेतील अभिनेत्री म्हणून नेहमीच कंगनाकडे पाहिले जात आहे. यापूर्वी कंगनाला तिच्या वादग्रस्त भूमिकेमुळे मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. अशातच तिनं संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमलवर केलेली टिप्पणी आता चर्चेत आली आहे. त्यावर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

ज्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल ८५० कोटींची कमाई केली त्या अॅनिमलच्या वाट्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मात्र या सगळ्यात त्याला काही जणांकडून ट्रोलही व्हावे लागले. त्यातील काही दृष्ये ही टीकेचा विषय होती. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देखील त्याविषयी प्रतिक्रिया दिली होती. २०२३ मधील सर्वात लोकप्रिय चित्रपट म्हणून अॅनिमलचे नाव घेता येईल.

कंगनानं तिच्या त्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्याच चित्रपटांच्यावेळेस निगेटिव्हीटी समोर येते. त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टही व्हायरल होत असतात. आणि हे मी सगळे अनुभवले आहे. मी माझ्या चित्रपटांसाठी खूप सारी मेहनतही करते. पण इथं लोकांना जर महिलांना मारहाण करणारे आणि त्यांना बूट चाटण्यास भाग पाडणारे चित्रपट आवडत असतील तर आपण आणखी काय बोलावे, असा प्रश्न कंगणानं तिच्या पोस्टमधून केला आहे.

कंगनाची ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एकानं तिच्यावर टीका केली आहे. ही अशा प्रकारची प्रतिक्रिया म्हणजे तुमची लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी तर सुरु नाही ना, असा प्रश्न त्या नेटकऱ्यानं विचारला आहे. त्यावर कंगनानं देखील त्याला जशास तसं उत्तर दिलं आहे. कंगना म्हणते, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. माझ्या दृष्टीनं राजकारण ही एक लोकसेवा आहे. तो काही धंदा नाही. जावेद अख्तर काय म्हणाले होते?

जावेद अख्तर हे नेहमीच त्यांच्या परखड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहेत. त्यांनी नुकतीच अॅनिमल या चित्रपटाच्या निमित्तानं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली होती. त्यांनी म्हटले होते की, अॅनिमल सारखे चित्रपट यशस्वी होतात हे पाहून आश्चर्य वाटते. ज्या चित्रपटामध्ये महिलांबाबत एवढं अवमानकारकरित्या भाष्य करण्यात आले त्याविषयी कुणी काहीही बोलायला तयार नाही.

चित्रपट पाहताना जे भान असायला हवे ते दिसत नाही. चित्रपट बनविणाऱ्यांबरोबरच तो पाहणाऱ्यांवर देखील मोठी जबाबदारी आहे. ही गोष्ट लोकांनी लक्षात ठेवावी. जर एखाद्या चित्रपटामध्ये हिरो महिलेला बूट चाटण्यास सांगतो तेव्हा त्याला त्यातून काय सांगायचे असते, ही किती खतरनाक गोष्ट आहे हे आपल्याला कळायला हवे.

Kangana Ranaut Bollywood Actress react
Maldives Row: "दोन आठवड्यांपासून ज्यांनी...." मालदिव वादात उडी मारत वीर दासनं बॉलीवूड सेलिब्रेटींची घेतली शाळा

अॅनिमलविषयी सांगायचे झाल्यास संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटातील अनेक प्रसंग आणि संवादावर आक्षेप घेण्यात आले होते. त्यातील काही दृष्यही वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. सोशल मीडियावर त्यावरुन चर्चेला उधाण आले होते. अर्जुन वेल्ली नावाच्या गाण्यावरुन झालेला वादही बऱ्याच काळ सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय होता. देशाच्या संसदेतही त्यावरुन मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com