देशभक्त कंगनाच्या आवडीच्या सिनेमांमध्ये बॉलीवूडचा फक्त एकच चित्रपट, बाकीचे सगळे..!| Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut

Kangana Ranaut : देशभक्त कंगनाच्या आवडीच्या सिनेमांमध्ये बॉलीवूडचा फक्त एकच चित्रपट, बाकीचे सगळे..!

Kangana Ranaut Bollywood Actress Share top Eight movies : बॉलीवूडमध्ये सतत आपल्या वक्तव्यांनी नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या कंगनाची गोष्ट वेगळी आहे. काहीही झालं तरी चालेल आपण चर्चेत राहिलं पाहिजे अशी कंगनाची भूमिका असते. त्यामुळे चर्चा करण्यासाठी, वाद घालण्यासाठी कंगनाला कोणताही विषय पुरेसा ठरतो.

कंगनाला तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. मात्र त्याचा कंगनावर काही एक परिणाम होत नाही. आता कंगना वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. त्यामुळे ती ट्रोल देखील झाली आहे. एरवी देशभक्तीचा टेंभा मिरवणाऱ्या कंगनाला देशभक्तीवरुन कुणी काही बोललं किंवा डिवचलं तर ती त्याची पर्वा न करता त्याला बोलून रिकामी होते. आता कंगनानं तिच्या आवडीच्या चित्रपटांची यादी शेयर केली आहे.

Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

हे बाकी खरंच की कंगना सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध आणि चाहत्यांच्या आवडीची अभिनेत्री आहे. मात्र देशभक्ती, देशप्रेम यावर भरभरुन बोलणाऱ्या कंगनाच्या आवडत्या सर्वोत्तम आठ चित्रपटांमध्ये हिंदीच्या केवळ एकाच चित्रपटाचा समावेश आहे. त्यामध्ये हॉलीवूडच्या चित्रपटांचा वाटा सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. तिच्या आवडत्या चित्रपटांची यादी व्हायरल झाली आहे.

कंगनाच्या आवडत्या चित्रपटांमध्ये स्टीव्हन स्पिलबर्ग यांच्या अमिस्तादचा समावेश आहे. याशिवाय द शोशँक रेडम्पेशन, अमेरिकन ब्युटी, आर्मर, सेव्हन इयर इच, इन्टरस्टेलर, आणि द नोटबूक या चित्रपटांची नावे आहेत. मात्र यासगळ्यात केवळ एकाच हिंदी चित्रपटानं कंगनाचं लक्ष वेधून घेतलं आहे. ते म्हणजे ख्यातनाम दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या प्यासा चित्रपटाला कंगनानं आपला सर्वाधिक आवडता हिंदी चित्रपट असे म्हटले आहे.

कंगनाच्या त्या चित्रपटांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीका करत आहे. कंगना तू नेहमीच इतरांना देशभक्तीविषयी सांगत असते. मात्र गोष्ट तुझ्याजवळ येते तेव्हा मात्र तू सोयीची भूमिका का घेते असा प्रश्न नेटकऱ्यांनी तिला विचारला आहे.