कंगनाला वाटते करणची भिती; मोदींना टॅग करून केले ट्विट

सुस्मिता वडतिले 
Wednesday, 2 September 2020

अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. नेहमीच कंगना अनेक विषयावर ट्विट करून व्यक्त होताना दिसून येते. सध्या ती एस.एस.आर. (SSR) प्रकरणाबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून एक असे ट्विट केले आहे की, करण जोहर विरोधात कारवाईची मागणी केली आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. नेहमीच कंगना अनेक विषयावर ट्विट करून व्यक्त होताना दिसून येते. सध्या ती एस.एस.आर. (SSR) प्रकरणाबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून एक असे ट्विट केले आहे की, करण जोहर विरोधात कारवाईची मागणी केली आहे.

 

बॉलिवूडमधील नावाजलेली आणि नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत तिच्या काही कारणांमुळे म्हणजेच धीट वाक्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक दिवस सुरु झालेल्या नेपोटिझमच्या वादामध्ये कंगना सुद्धा होती. त्यावेळी कंगना बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांवर टीका केली होती. कंगना रणौत आणि करण जोहर यांचं जास्त पटत नाही, काही ठिकाणी कंगना आणि करण या एकमेकांबद्दल नाराजी व्यक्त केली गेली आहे.

कंगना रणौतने यावेळी ही करण जोहरवर टिका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केले आहे. तसेच जोहर विरोधात योग्य कारवाईची मागणी केली आहे. कंगनाने करण जोहरला मूव्ही माफियांचा मुख्य गुन्हेगार असून '@PMOIndia अनेकांचे आयुष्य आणि करिअर संपवल्यानंतरही तो मुक्त आहे. असे असताना सुद्धा अजूनही त्याच्यावर कोणतीही कारवाई केलीच नाही, असा प्रश्न कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. 

अभिनेत्री कंगनाने करण जोहरच्या नवीन पुस्तकाची घोषणा करणारे ट्वीट रीट्वीट करून त्यासंदर्भात त्याचा समाचार घेतला आहे. करण हा त्याच्याच मुलांना प्रमोट करत आहे असा हि आरोप त्याच्यावर केला आहे. याप्रकरणाबाबतीत ड्रग अँगल समोर आल्यानंतर कंगना रणौतने मदत करू इच्छित असल्याचे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सांगितले होते. कंगनाने इंडस्ट्रमध्ये येणारे ड्रग तसेच त्यासंबंधी अनेक गोष्टी माहिती असून मदत करू इच्छित असल्याचे कंगनाने ट्विट करून सांगितले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranaut has demanded action against Karan Johar