कंगनाने मुंबई सोडली; जाता जाता पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 14 September 2020

मुंबई सोडताना खूप दु:ख होत आहे. मागील काही दिवसांत मी दहशतीत होते. कार्यालय तोडल्यानंतर माझे घर तोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मला शिवीगाळीचा सामना करावा लागला, असा उल्लेख कंगनाने ट्विटमध्ये केलाय.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावने 5 दिवसानंतर मुंबईतून मनालीला रवाना झाली आहे. तिच्यासोबत बहिन रंगोली चंदेल आणि तिचा सहकारी देखील सोबत होता. मुंबईहून परतण्यापूर्वी कंगनाने राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. मुंबई महानगर पालिकेने कार्यालयावर केलेल्या कारवाईसंदर्भात न्याय मिळावा, अशी मागणी तिने राज्यपालांना केली होती. कंगनाने ट्विटच्या माध्यमातून मुंबई सोडत असल्याची माहिती दिली आहे. 

तिने ट्विटमध्ये लिहिलंय की,  मुंबई सोडताना खूप दु:ख होत आहे. मागील काही दिवसांत मी दहशतीत होते. कार्यालय तोडल्यानंतर माझे घर तोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मला शिवीगाळीचा सामना करावा लागला. सुरक्षिततेसाठी हत्यारबंद जवानसोबत फिरणे म्हणजे पाक व्याप्त काश्मीरमध्ये वावरत असल्यासारखेच होते, असे म्हणत तिने जाता जाता मुंबईची पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केलीय. एवढेच नाही तर महाआघाडी सरकारमध्ये लोकशाही संपुष्टात आल्याचे दिसते, असा आरोपही कंगनाने केला आहे.  आणखी एका ट्विटमध्ये तिने लिहिलंय की, रक्षकच भक्षक बनून लोकशाहीला सुरुंग लावण्याचे काम करताना दिसते. एका महिलेला धमकावून तिला कमी लेखून राज्य सरकार आपली प्रतिमा मलिन करत आहे, असा उल्लेखही कंगनाने ट्विटमध्ये केलाय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana ranaut leave mumbai comapre with pok once again says maharashtra govt democracy down