कंगना सुधारली;करिनाच्या पोस्टवर केलेली कमेंट नेटक-यांना भावली...Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kangana Ranaut, kareena Kapoor-Khan

कंगना सुधारली;करिनाच्या पोस्टवर केलेली कमेंट नेटक-यांना भावली...

कंगना(Kangana Ranaut) आणि करिना(Kareena Kapoor-Khan) दोघीही इंडस्ट्रीतल्या दमदार अभिनय करणा-या अभिनेत्री. बॉलीवूडमध्ये कॅट फाइट असतेच दोन अभिनेत्रींमध्ये. अर्थात करिनाचं तर अगदी राणी मुखर्जीपासून बिपाशा बासू,प्रियंका चोप्रा अशा सगळ्या अभिनेत्रींसोबत खटके उडालेयत. उघडपणे आपल्या बेबो ने अनेकदा कबुलही केले आहेत. आता आपल्या कंगना बाईंनी तर केवळ अभिनेत्रींसोबत नाही तर इंडस्ट्रीतल्या अर्ध्याअधिक हिरोंपासून दिग्दर्शक निर्माते अशा सगळ्यांपर्यंत पंगे घेतले आहेत. एवढं काहीबाही कंगना बाईंचं बरळून झालंय की अगदी त्यांना सोशल मीडियानंच काही काळापुरतं बॅन केलं होतं. कितीतरी केसेसमध्ये ती अडकली ते याच तिच्या सोशल मीडियावरील वादग्रस्त विधानांमुळे.

हेही वाचा: 'बिग बॉस 3'चा विनर विशाल निकम जाणार आर्मीत? सविस्तर वाचा...

आता तसं पहायला गेलं तर कंगना-करिना दोघीही फटकळ. पण करिनापेक्षा कंगना बेछूट,बेफ्रिक्रीने बोलणारी. असो,आता हे सगळं एवढं फिरवून-फिरवून सांगण्याचं कारण इतकच की करिना आणि कंगनामध्ये असा सोशल मीडियावर वाद रंगलेला फारसा पाहण्यात आला नाही. अर्थात बेबो वाचलीच म्हणायची. आता तर एक गोष्ट अशी समोर आलीय की करिनाच्या पोस्टवर कंगनानं केलेली कमेंट पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. कंगनाला अचानक काय झाले,इतकी चांगल्याप्रकारे ती कशी काय व्यक्त होवू लागली अशा चर्चेला उधाण आलंय. काय होती करिनाची पोस्ट आणि काय आहे कंगनाची कमेंट? वाचा सविस्तर

हाट फोटो करिनाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

तर करिनानं सैफ आणि तैमूरचा एक फोटो शेअर केलाय. जो सकाळी-सकाळी तिनं काढलेला आहे. ज्या फोटोत सैफ ब्रेकफास्ट करीत आहे आणि तैमूर एका वहीत बहुधा चित्र काढण्याचा प्रयत्न करीत आहे. ती बेडरूमही तैमूरची दिसतेय. कारण भिंतीवर लहान मुलांच्या रुमला शोभेल असं प्राण्यांचे चित्र असलेलं वॉलपेंटिंग आहे. बेडवरील ब्लॅंकेटही काहीसं त्याच पद्धतीचं आहे. करिनानं या पोस्टला कॅप्शन दिलंय, ''सैफ- बेबो, तू आणखी एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी क्लिक करतेयस का? बेबो- सैफ अॅन्ड टीमटीम...माय बॉईज.....'' अशा तिच्या पोस्टवर आपल्या कंगनाबाईंनी चक्क,''ब्युटिफुल'' म्हणत रेड हार्ट इमोजी कमेंटबॉक्स मध्ये पोस्ट केलाय. आता कंगनाकडून अशी कमेंट अपेक्षित नसलेल्या नेटक-यांनाही हे वाचून धक्का बसलाय. सैफ अली खान आणि कंगनानं 'रंगून' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. बहुधा म्हणून कंगनाबाई वाकडं काही बोलल्या नसाव्यात. एकत्र काम करण्याचा अनुभव दोघांचा चांगला असावा.

Web Title: Kangana Ranaut Post Comment On Kareenas Post Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top