esakal | 'बॉलीवूड माफीया' मोठ्या मनाचे नाहीत कौतूक करायला, 'थलाईवी' ची आगपाखड
sakal

बोलून बातमी शोधा

बॉलीवूड माफीया माझ्या चित्रपटाचं कौतूक करणार नाही, कारण...

बॉलीवूड माफीया माझ्या चित्रपटाचं कौतूक करणार नाही, कारण...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवू़डमध्ये (bollywood) सर्वात वादग्रस्त अभिनेत्री कोणती, असा प्रश्न जर प्रेक्षकांना विचारला तर त्यांना कंगनाच नाव घ्यायला अजिबात (kangana ranaut) वेळ लागणार नाही. आतापर्यत बॉलीवूडमध्ये झालेल्या वेगवेगळ्या वादांना कारणीभूत असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना असल्याचे बऱ्याचदा दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी तिला जावेद अख्तर यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यांच्यावर मानहानीकारक आरोप केल्यानं कंगनाला न्यायालयानं सुनावणीच्या वेळेस हजर राहण्यास बजावले होते. तीनदा सुनावणी होऊनही त्याला हजर न राहिल्यानं तिला समन्स बजावण्यात आले होते. अखेर ती कोर्टात हजर झाली. आणि तिची अटक टळली. आता पुन्हा एकदा ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याचे कारण तिनं आपल्या थलाईवी चित्रपटाचे कौतूक न करणाऱ्या बॉलीवूड माफीयांवर निशाणा साधला आहे. ते कधीही आपलं कौतूक करणार नाही. अशी प्रतिक्रिया कंगनानं दिली आहे.

23 एप्रिलला कंगनाची थलाईवी नावाची मुव्ही रिलिज होणार होती. ती 10 सप्टेंबरला रिलिज झाली. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. त्या चित्रपटांवरुन कंगना चर्चेत होती. त्यावरुन वादही झाला होता. मात्र कंगनाच्या अपेक्षेनुसार त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर हा चित्रपट बेतलेला होता. त्यात तिनं त्यांची भूमिका वठवली. त्यासाठी तिनं काही वर्षांपासून तयारीही केली होती. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी कंगनानं सर्वांना धन्यवादही दिले आहे. मात्र त्यावर अद्याप बॉलीवूड माफीयांची कुठलीही प्रतिक्रिया न आल्यानं कंगनाला राग आला आहे. तिच्या म्हणण्यानुसार ते कधीही माझ्या चित्रपटाचे कौतूक करणार नाही.

याविषयी कंगनानं सोशल मीडियावर लिहिलं आहे की, फार कमी चित्रपट असे असतात की, त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळते. थलाईवी हा त्यापैकी एक चित्रपट आहे. लोकांना जयललिता यांचे आयुष्य जाणून घ्यावेसे वाटले आणि त्यांनी हा चित्रपट पाहिला. त्यावर प्रतिक्रियाही दिल्या. यासाठी मी माझ्या टीमला मनपूर्वक धन्यवादही देते. मला एका गोष्टीचा राग आला आहे तो म्हणजे बॉलीवूडचे जे माफीया आहेत त्यांनी माझ्या चित्रपटाविषयी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

मी त्या माफीयांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. मी त्यांच्या कामाचे कौतूक करण्यास मागेपुढे पाहत नाही. मात्र ते दिलखुलासपणे माझ्या चित्रपटांविषयी काही बोलायला तयार नाही. त्यांनी जरा मनाचा मोठेपणा दाखविण्याची गरज आहे. असे मला वाटते. कंगनाच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांचा प्रतिसादही मिळाला आहे.

हेही वाचा: अखेर कंगना कोर्टात हजर : जावेद अख्तर मानहानी प्रकरण

हेही वाचा: 'जेवढं कमावलं तेवढं गमावलं, काय ते कपडे'; कंगना ट्रोल

loading image
go to top