अखेर लग्न करायला तयार झाली कंगणा !

वृत्तसंस्था
बुधवार, 8 जानेवारी 2020

बॉलिवूडची 'क्वीन' म्हणजेच कंगणा रणावतही लग्न करणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलं ! हा खुलासा दुसरं तिसरं कोणी नाही तर कंगणाने स्वत: च केला आहे. 

मुंबई : बॉलिवूडमध्ये लव्ह-अफेअर, ब्रेकअप आणि लग्न याचा सिलसिला तर सुरुच असतो. चाहत्यांच्या फेवरेट लिस्टमध्ये दीपिका-रणवीर, अनुष्का-विराट आणि प्रियांका-निक या जोड्या अव्वल स्थानावर आहेत. पण, चाहत्यांना सिंगल असलेल्या कलाकारांच्या लग्नाचीही तितकीच प्रतिक्षा आहे. बॉलिवूडची 'क्वीन' म्हणजेच कंगणा रणावतही लग्न करणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलं ! हा खुलासा दुसरं तिसरं कोणी नाही तर कंगणाने स्वत: च केला आहे. 

मागिल वर्षी म्हणजेच 2019 मध्ये 'जजमेंटल है क्या' आणि 'मणिकर्णिका' या दोन सुपरहिट चित्रपटानंतर कंगणा याही वर्षी तिच्या दमदार चित्रपटांसह सज्ज झाली आहे. 'थलायवी' आणि 'पंगा' या चित्रपटांचे ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलिज झाले आहेत. या दोन्ही सिनेमांमध्ये कंगणा कमाल भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगणाच्या अभिनयाचं हे वैशिष्ठ्यच म्हणावं लागेल की ती प्रत्येक चित्रपटामध्ये अनोख्या भूमिका साकारते आणि त्यांना उत्तम अभिनयाने पूर्ण न्यायही देते. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान कंगणाने खुलासा केला आहे की तिला लग्न करायचं आहे. कंगणाने सांगितलं की,'मी आता आयुष्याच्या त्या वळणावर आहे जिथे मला केवळ डेटिंगची गरज भासत नाही. अशा वळणावर मला प्रेरणा देणारी व्यक्ती जवळ असावी असे वाटते.'

कंगणाचं लव्ह लाइफ नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. आदित्य पांचोली आणि मग हृतिक रोशनसोबतच्या नात्याची चर्चा गाजली. कंगणा तिच्या पूर्व अफेअरविषयी खुलेपणाने बोलली आहे. ज्या पद्धतीच्या भूमिका सिनेमात ती साकारते तशीच खणकर आणि स्पष्टवक्ती ती खऱ्या आयुष्यातही आहे. लग्नाविषयी बोलताना कंगणा म्हणाली, ' या पूर्वी डेटिंग केलं आहे. प्रेमाच्या नात्यात मला अधिकतर वाइटच अनुभव आले आहेत पण त्यातून मी लवकर सावरले. मी मूव्ह ऑन केलं. 'पंगा' चित्रपटाची दिग्दर्शिका अश्विनी अय्यर यांचे पती नितेश तिवारी यांच्याकडे बघितल्यावर माझा प्रेमाविषयीचा दृष्टिकोन बदलला. त्या दोघांकडे पाहिल्यावर लग्नाविषयीचा विचार बदलला आणि लग्न करणं शक्य आहे असं वाटतं. आता मी लग्नासाठी तयार आहे. नक्कीच लग्नासाठी ती खास व्यक्ती शोधणं कठीण आहे.'

कंगणाचा 'पंगा' हा चित्रपट 24 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरील बायोपिकमध्येही कंगना मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'थलायवी' असं त्या सिनेमाचं नाव असून त्याचा पोस्टर आणि टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranaut talks about marriage and love