Kangana Ranaut:...तर मी निवडणूक लढवणार, कंगनानं दिले लोकसभा निवडणूकीचे संकेत

कंगना रनौत दर्शनासाठी द्वारकाधीश मंदिरात पोहोचली आहे. यावेळी तिने मीडियाशीही संवाद साधला त्यावेळी तिने पहिल्यांदाच राजकारणात येण्याचे संकेत दिले.
Kangana Ranaut
Kangana RanautEsakal

Kangana Ranaut: बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत ही सध्या तिच्या तेजस या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे. कंगनाला या चित्रपटापासून खुप अपेक्षा होत्या मात्र तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे बजेटही काढू शकला नाही.

Kangana Ranaut
Marathi Movie : फुलंब्रीकर कुटूंब एवढं का चर्चेत आलंय? 'एकदा येऊन तर बघा' ची गोष्टच वेगळी!

कंगनाचे मागील अनेक चित्रपट सातत्याने फ्लॉप होत असल्याने आता कंगनासाठी ही खुपच चिंतेची बाब ठरली आहे. सातत्याने चित्रपट फ्लॉप होत असल्याने कंगना आता खुपच चिंताग्रस्त झाल्याचं दिसत आहे.

आता कंगना मानसिक शांतीसाठी नुकतीच द्वारकाधीश मंदिरात गेली होती. कंगनाने तिचे काही फोटो देखील सोशल मिडियावर शेयर केले आहेत. सध्या कंगनाचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

कंगनाने तिचे काही फोटो आणि एक रिल सोशल मिडियावर शेयर केला आहे. फोटो शेयर करताना कंगनाने लिहिले होते की, "काही दिवसांपासून माझे मन खूप व्याकुळ झाले होते, द्वारकाधीशाचे दर्शन घ्यावेसे वाटले, श्री कृष्णाच्या या दिव्य नगरी द्वारकेत येताच येथील धूळ पाहिल्यानंतरही माझ्या सर्व चिंता दुर झाल्यासारखे वाटते.

माझे मन स्थिर झाले आणि मला खुप प्रसन्न वाटलं. हे द्वारिकेच्या स्वामी, तुझा आशीर्वाद असाच ठेव. हरे कृष्णा". यासोबत कंगनाने एक व्हिडिओ देखील शेयर केला आहे. या फोटोत कंगनाने पिवळ्या रंगाची साडी परिधान कपाळावर मोठी बिंदी लावत तिचा सिंपल लूक पुर्ण केला आहे.

सध्या कंगनाची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. काहींना कंगनाची चिंता होत आहे. एकानं लिहिले की, 'ती डिप्रेशनमध्ये जात आहे, हे स्पष्ट दिसत आहे' तर दुसऱ्याने लिहिले की, चित्रपट फ्लॉप झाला तर मन नक्कीच अस्थिर होईल.

तर दुसरीकडे सतत चित्रपट फ्लॉप होत असल्यामुळे आता ती राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत.

Kangana Ranaut
MC Stan Debut: एमसी स्टॅनवर सलमान 'मेहरबान'! 'फर्रे'तून बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज

कंगनाने द्वारकाधीश मंदिरात पोहोचल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याच्या चर्चा आहेत. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, कंगनाने मिडियासोबत बोलताना सांगितले की, 'जर भगवान श्रीकृष्णाची कृपा झाली तर ती लोकसभा निवडणूक लढवू शकते.'

Kangana Ranaut
Urfi Javed Arrested: बोल्ड कपडे घालणं अखेर उर्फीच्या आलं अंगलट? पोलिसांनी घेतलं ताब्यात? व्हिडिओ व्हायरल

कंगनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कंगना आता इमर्जन्सी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगनानेच केले आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

तिच्यासोबत अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण हे महत्वाच्या भुमिकेत दिसणार आहे. आता तेजस फ्लॉप झाल्यानंतर तिच्या चाहत्यांना आणि कंगना देखील तिच्या आगामी सिनेमापासून खुप अपेक्षा आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com