करणी सेना, लक्षात ठेवा मी पण राजपूत: कंगना

वृत्तसंस्था
शनिवार, 19 जानेवारी 2019

'मणिकर्णिका  : द क्वीन ऑफ झाँसी' हा सिनेमा चार इतिहासकारांनी प्रमाणित केल्याची माहिती कंगनाने दिली आहे. सेन्सॉर बोर्डाकडूनही या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात आले आहे. शिवाय करणी सेनेलाही कळवण्यात आले होते. तरीही करणी सेनेने मला किंवा या सिनेमाशी संबंधित कोणालाही त्रास देणे थांबवले नाही, तर मी एकएकांना उद्ध्वस्त करेन.

मुंबई : पद्मावत नंतर आता कंगना राणावतची प्रमुख भूमिका असलेल्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाला महाराष्ट्र करणी सेनेने विरोध केल्याने कंगना राणावतनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

महाराष्ट्रातील करणी सेनेने 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दाखवण्यात यावा, अशी मागणी करणी सेनेने केली आहे. या सिनेमात राणी लक्ष्मीबाई यांचे एका ब्रिटीश अधिकाऱ्यासोबत संबंध दाखवण्यात आल्याच्या काही बातम्या आल्यानंतर करणी सेनेने या सिनेमाला विरोध सुरु केला आहे. मणिकर्णिका या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई साकारणाऱ्या कंगना राणावतने करणी सेनेची मागणी धुडकावून लावली आहे. कंगना म्हणाली, की करणी सेनेने त्रास द्यायचे थांबिवले नाही, तर मी पण राजपूत आहे. सर्वांना उद्ध्वस्त करेन.

'मणिकर्णिका  : द क्वीन ऑफ झाँसी' हा सिनेमा चार इतिहासकारांनी प्रमाणित केल्याची माहिती कंगनाने दिली आहे. सेन्सॉर बोर्डाकडूनही या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात आले आहे. शिवाय करणी सेनेलाही कळवण्यात आले होते. तरीही करणी सेनेने मला किंवा या सिनेमाशी संबंधित कोणालाही त्रास देणे थांबवले नाही, तर मी एकएकांना उद्ध्वस्त करेन.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranaut warns Karni Sena ahead of Manikarnika If harassed I will destroy each one of them