'जर ते मला अटक करायला आले..'; दुसऱ्या FIR वर कंगनाची प्रतिक्रिया | Kangana ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kangana Ranaut

'जर ते मला अटक करायला आले..'; दुसऱ्या FIR वर कंगनाची प्रतिक्रिया

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत ही नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शीख समुदायाविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतविरुद्ध मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आला. बुधवारी, कंगनाने इंस्टाग्रामवर एफआयआरवरील तिच्या प्रतिक्रियेचं वर्णन करणारा एक फोटो पोस्ट केला आहे.

कंगनाने २००४ च्या फोटोशूटमधील एक जुना फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती हातात ग्लास घेऊन पोज देताना दिसत आहे. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर फोटो शेअर करताना तिने लिहिलं, "दुसऱ्या दिवशी, आणखी एक एफआयआर. जर ते मला अटक करायला आले तर.."

दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे (DSGMC) अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा, दादरच्या श्री गुरु सिंग सभा गुरुद्वाराचे अमरजीत सिंग संधू आणि सर्वोच्च परिषद नवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष जसपालसिंग सिद्धू यांनी एफआयआर दाखल केला आहे. अमरजीत सिंग संधू यांनी कंगनावर 'आपल्या समुदायाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचा' आरोप केला.

Kangana Ranaut

Kangana Ranaut

गेल्या आठवड्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वादग्रस्त शेतीविषयक कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर कंगनाने प्रतिक्रिया दिली. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक प्रतिमा-मजकूर पोस्ट केला होता. कंगनाच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीत, डीएसजीएमसीने नमूद केलं आहे की तिने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या निषेधाला “खलिस्तानी” चळवळ म्हणून संबोधलं आहे.

loading image
go to top