कंगना रानौतचा 'तेजस' डिसेंबरमध्ये घेणार टेक ऑफ

संतोष भिंगार्डे
Saturday, 29 August 2020

कंगना रानौतची मुख्य भूमिका असलेल्या तेजस या चित्रपटाच्या चित्रीकरणाला डिसेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे

मुंबई ः कंगना रानौतची मुख्य भूमिका असलेल्या तेजस या चित्रपटाच्या चित्रीकरणाला डिसेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे. तेजसमध्ये एका धाडसी व साहसी अशा महिला फायटर पायलची कहाणी आहे. हा चित्रपट सर्वेश मेवाडने लिहिला आहे आणि त्यानेच दिग्दर्शित केला आहे.

सीबीआय चौकशीनंतर रिया चक्रवर्ती पोलिस ठाण्यात का गेली? भाजप आमदाराने केला सवाल

उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाची निर्मिती रौनी स्क्रूवाला यांनी केली होती. या चित्रपटाला चांगलेच यश मिळाले. आता तेजस या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली आहे. 2016 मध्ये भारतीय वायु सेना दलातील महिला तुकडीला प्रत्यक्ष युद्ध भूमिकेत सहभागी करणारी देशातील पहिलीच सुरक्षा सेना होती आणि हा चित्रपट याच ऐतिहासिक घटनेने प्रेरित आहे. या चित्रपटाचे उर्वरित चित्रीकरण बाकी आहे.

पोल्का प्रिंट ड्रेस आणि प्रेग्नंसी कनेक्शन, अनुष्का शर्माच्या ड्रेसवरुन मजेदार मीम्स व्हायरल 

या चित्रपटाचा पहिला लूक बाहेर आला आहे आणि आता डिसेंबरमध्ये चित्रीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. कंगना म्हणाली, की तेजस या चित्रपटात मला वायुसेनेच्या पायलटची भूमिका साकारायला मिळाली हे माझे भाग्य आहे. ही कथा खूप विस्ताराने मांडण्यात आली आहे. गेले कित्येक वर्ष मी अशी भूमिका साकारायला मिळावी याची वाट पाहात होते आणि आता माझी ही इच्छा या चित्रपटाच्या रूपाने पू्र्ण होत आहे. आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. मी माझ्या प्रत्येक चित्रपटासाठी मेहनत घेतच असते. मी दिग्दर्शक सर्वेश आणि निर्माते रोनी यांची खूप आभारी आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranauts Tejas to take off in December