Kangana Ranaut Post : 'मी कधीही कुणाच्या लग्नात नाचले नाही, माणसाचं सर्वात मोठं धन म्हणजे...' कंगनाची 'ती' पोस्ट नेमकी कुणासाठी?

कंगनाची 'ती' पोस्ट आता सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळे तर्क वितर्क लढवले आहेत.
Kangana Ranaut latest news
Kangana Ranaut latest newsesakal

Kangana Ranaut insta photo story : अनंत अन् राधिकाच्या प्री वेडिंगवरुन सध्या वेगळ्याच प्रकारची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. या प्री वेडिंग सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर होते. जगभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला लावलेली उपस्थिती खूप काही सांगून जाणारी होती. यात आता कंगनाच्या पोस्टनं प्री वेडिंग आणि त्याला उपस्थिती लावणारे सेलिब्रेटी वरुन वाद सुरु झाला आहे.

कंगना ही बॉलीवूडमधील अशी एक सेलिब्रेटी आहे ती नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दिसते. आता पुन्हा कंगना ही तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ती पोस्ट तिनं अनंत अन् राधिका प्री वेडिंगला उपस्थिती लावणाऱ्या सेलिब्रेटींविषयी तर नाही ना....अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरु झाली आहे. कंगनाच्या इंस्टा स्टोरीवर आहे तरी काय, तिनं सेलिब्रेटींवर आगपाखड केल्याच्या प्रतिक्रियांना उधाण आलं आहे.

Kangana News
Kangana News

कंगनाच्या इंस्टा स्टोरीचा स्क्रिन शॉट व्हायरल होतो आहे. त्यामध्ये तिनं स्वताची तुलना लता मंगेशकर यांच्यासोबत केली आहे. तिनं एका लेखाचा दाखला दिला आहे. ती म्हणते, मला पाच लाख डॉलर दिले तरी मी येणार नाही. मी खूप साऱ्या बिकट आर्थिक परिस्थितीला सामोरी गेली आहे. मात्र आता मी आणि लताजी आम्ही दोघेच असे सेलिब्रेटी आहोत ज्यांची सगळी गाणी लोकप्रिय झाली आहे.

यावेळी कंगनानं फॅशन का जलवा, घनी बावली हो गई, लंडन ठुमकदा, साडी गली,विजय भव या गाण्यांचे दाखले दिले आहेत. मात्र आम्ही असे काही केले नाही. लोकं मला कितीही प्रलोभनं दाखवू देत मी कधीही दुसऱ्यांच्या लग्नात नाचले नाही. कित्येकदा सुपरहिट आयटम साँग देखील मला ऑफर करण्यात आले होते. पण ते केले नाही.

Kangana Ranaut latest news
Anant -Radhika Pre Wedding : 'दोन तीन नव्हे पाचपट पैसे दिले तरी लग्नात गाणं म्हणणार नाही'! लता दीदींची होती ठाम भूमिका!

मी कधीही कोणत्या पुरस्कार सोहळ्याला गेली नाही. पैसा आणि प्रसिद्धी याला नाही म्हणण्यासाठी तुमच्याकडे शुद्ध चारित्र्य आणि अभिमानाची गरज असते. युवा पिढीला एक गोष्ट समजण्याची गरज आहे की, सर्वात मोठं धन हे ईमानदारी आहे. कंगनानं भलेही त्या पोस्टमध्ये कुणाचं नाव घेतलं नाही. पण तिच्या त्या पोस्टवरुन ती कुणाबद्दल बोलली आहे याचा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला आहे.

कंगनाच्या त्या पोस्टवरुन आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. ती नेमकं कुणाला बोलली आहे, तिचा बोलण्याचा रोख अंबानी यांच्या राधिका अन् अनंतच्या प्री वेडिंगमध्ये सहभागी झालेल्या बॉलीवूड कलाकारांसाठी तर नाही ना, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Kangana Ranaut latest news
Rajnikanth On Anant Radhika Pre Wedding : 'अंबानींच्या लेकाचं प्री वेडिंग म्हणजे साक्षात...' सुपरस्टार रजनीकांत काय म्हणाले?

गुजरातमधील जामनगर येथे अनंत अन् राधिकाच्या प्री वेडिंगचे आयोजन करण्यात आले होते. त्यात थलायवा रजनीकांत, अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांच्यासह दीपिका, रणवीर, सैफ अली खान, करिना कपूर आदी सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com