'देवभूमीतून पैसा कमविणा-यांना हरामखोर म्हणण्याचे काय कारण ?'

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 1 November 2020

कंगणाच्या एका ट्विटवरून चिडलेल्या संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाला हरामखोर मुलगी, असे म्हटले होते. कंगणाने आपल्या एका ट्विटमध्ये हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या 'भूत पुलिस' या चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित न्यूज आर्टिकल शेअर केले आहे.

मुंबई -  कंगणा आणि तिच्या भोवतीचे वाद हे सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वी तिचा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याशी वाद झाला होता. त्यावर आता कंगणाने पुन्हा राऊत यांना व्टिटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.  देव भूमी प्रत्येक भारतीयाची आहे आणि कुणी या राज्यातून पैसे कमवत असेल, तर त्याला 'हरामखोर' अथवा 'नमकहराम' म्हटले जाणार नाही. असे कंगणाने म्हटले आहे. अशाप्रकारे वक्तव्य करुन कंगणाने पुन्हा राऊत यांच्याशी पंगा घेतला आहे.

कंगणाच्या एका ट्विटवरून चिडलेल्या संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाला हरामखोर मुलगी, असे म्हटले होते. कंगणाने आपल्या एका ट्विटमध्ये हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या 'भूत पुलिस' या चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित न्यूज आर्टिकल शेअर केले आहे. " आपण सध्या हिमाचल मुंबईच्या अनेक फिल्म यूनिट्सचे होस्टिंग करत आहे. देव भूमी प्रत्येक भारतीयाची आहे आणि कुणी या राज्यातून पैसे कमवत असेल, तर त्याला 'हरामखोर' अथवा 'नमकहराम' म्हटले जाणार नाही. जर, असे कुणी म्हणत असेल तर, मी त्याची निंदा करते, बॉलीवुड प्रमाणे गप्प बसणार नाही." असे कंगणाने म्हटले आहे.

कृपलानी दिग्दर्शित हॉरर कॉमेडी फिल्म 'भूत पुलिस'ची शूटिंग हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथे सुरू आहे.  सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडीस, यामी गौतम आणि प्रोड्यूसर्स रमेश तौरानी आणि अक्षय राय   हिमाचल प्रदेश याठिकाणी आहे.  कंगणाने गेल्या महिन्यात सुशांत सिंह राजपूत केसवरून मुंबई पोलिसांवर टीका केली होती. इतकेच नाही, तर तिने संजय राऊतांवर तिला मुंबईमध्ये न येण्याची धमकी देण्याचा आरोपही केला होता. तसेच मुंबईची तुलना POK सोबत केली होती.

कंगनाच्या ट्विटवरून भडकलेल्या संजय राऊतांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाला हरामखोर मुलगी, असे म्हटले होते. या वक्तव्यावर चहू बाजूंनी राऊतांवर टिका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना हरामखोरचा अर्थ नॉटी, असा सांगितला . 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana replay on sanjay raut statement tweet viral