कंगणाच्या बहिणीने सांगितला अॅसिड हल्ल्याचा तो भयानक प्रसंग

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

कंगणाची बहिण रंगोलीने सोशल मीडिय़ावर तिच्या आयुष्यातील एक धक्कादायक आणि वेदनादायी प्रसंग शेअर केला आहे. त्याचसोबत तिने काही जूने फोटो शेअर केले आहेत.

मुंबई : बॉलिवूडमध्ये सर्वात बोल्ड आणि मते परखडपणे मांडणारी अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे कंगणा रणौत. आपली मते केवळ ब़ॉलिवूडपर्यंत मर्य़ादित न ठेवता तितच्याच परखडपणे ती इतर विषयही मांडते. कंगणाला साथ देण्यासाठी तिची बहिण रंगोली चांडेल नेहमीच पुढे असते. परखड मतांमुळे अनेकदा या बहिणींना विरोधाचा सामना करावा लागला आहे. तरीही आजही निर्भिडपणे कंगणा आणि रंगोली आपली मते मांडत असतात. रंगोली सोशल मीडियावर अॅक्टीव असते. सध्या रंगोली चर्चत आहे ती वेगळ्याच कारणाने. रंगोलीने सोशल मीडिय़ावर तिच्या आयुष्यातील एक धक्कादायक आणि वेदनादायी प्रसंग शेअर केला आहे. त्याचसोबत तिने काही जूने फोटो शेअर केले आहेत.

हा प्रसंग आहे अॅडिस हल्याचा ज्यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली होती. त्याचसोबत कंगणालाही मारहाणीचा सामना करावा लागला होता. लहानपणीचे आणि कॉलेजच्या दिवसातले काही फोटो माझे अनेक मित्र बरेच दिवस शेअर करण्यासाठी सांगत होते असं रंगोलीने हे फोटो शेअर करताना म्हटलं आहे. फोटो आणि पोस्ट तिने ट्विटवर शेअर केली आहे.

अॅसिडचा धक्कादायक प्रकार सांगाताना रंगोलीने लिहिलं,' हा फोटो काढल्यानंतर काही वेळानेच एका मुलाने ज्याच्या प्रपोजल मी नकार दिला होता त्याने माझ्या चेहऱ्यावर एक लीटर अॅसिड फेकलं होतं. माझ्यावर 54 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि छोटी बहिण कंगणाला जबरी मारहाण करण्यात आली होती. तिला जीवे मारण्याचा प्रयत्न त्या मुलाने केला. का? कारण, आमच्या आई वडिलांनी सुंदर , हुशार आणि आत्समविश्वासू  अशा मुलींना जन्म दिला होता.'

पुढे ती म्हणाली,' आजही मुलींना चांगली वागणूक मिळत नाही. समाजाच्या या समेस्यवर आपल्य़ाला लढायला हवं. आपल्य़ा मुलांच्या सुरक्षिततेसाठी हे करणं भाग आहे.' रंगोलीने सांगितलं की, 54 शस्त्रक्रिया करुनही डॉक्टर तिचा कान ठिक करु शकले नाही. अॅसिड हल्ल्यामध्ये रंगोलीचा डोळाही अपंग झाला ज्याला ट्रान्सप्लांट करण्यात आलं. रस्यावरील हे रोमिओ समाजाचे सर्वात मोठे शत्रू आहेत आणि त्यांच्याविरोधी आपण लढलं पाहिजे असंही मत रंगोलीने व्यक्त केलं. 

कंगणाला आजी 'पिली' या नावाने हाक मारायची कारण..
रंगोलीने चाहत्यांना तिच्या लहानपणीचा किस्सा सांगितला. लहानपणी कंगणाच्या त्वचेचा रंग पिवळसर होता. म्हणून तिची आजी कंगणाला 'पिली' नावाने हाक मारत असे. 

'एजिझम' च्या मुद्यावर रंगोलीचा पुढाकार 

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी 'एजिझम' चा मुद्दा उपस्थित केला होता. सांड की आंख या चित्रपटातील रोलविषयी त्यांनी मत व्यकत करताना सांगितलं की निदान आमच्या वयाचे रोल तरी आम्हाल करु द्या'. अशी टीका केल्यानंतर रंगोलीने त्यांना ट्विटरवरुन पाठिंबा दिला होता. ती  'एजिझम' च्या मुद्यावर खुलेपणाने बोलली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana s sister Shares Her Horrifying Acid Attack Story