esakal | 'कंगणासोबत काम करायचे म्हणजे मोठी डोकेदुखी'
sakal

बोलून बातमी शोधा

kangana took charge of the set and began directing other actors

बॉलीवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक हंसल मेहता यांनी कंगणाला घेऊन सिमरन नावाचा चित्रपट केला, त्यावेळी कंगणाच्या हेकेखोरपणाला आपण जाम वैतागल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

'कंगणासोबत काम करायचे म्हणजे मोठी डोकेदुखी'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - आता परिस्थिती अशी आहे की, अभिनेत्री कंगणाच्या बाजूने कुणी  बोलायला तयार नाही. बॉलीवूडमधल्या भल्याभल्यांशी पंगा घेतल्यानंतर ती आता अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिची ती सततची वादग्रस्त वक्तव्ये भलेही तिला चर्चेत ठेवत असली तरी त्यामुळे तिच्याभोवतीचे संकट आणखी गडद होताना दिसत आहे. प्रख्यात दिग्दर्शक हंसल मेहता यांनी तिच्यासोबत काम करताना आलेले अनुभव शेयर केले आहेत. यासगळ्या प्रक्रियेत आपल्याला प्रचंड मानसिक त्रास झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बॉलीवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक हंसल मेहता यांनी कंगणाला घेऊन सिमरन नावाचा चित्रपट केला, त्यावेळी कंगणाच्या हेकेखोरपणाला आपण जाम वैतागल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून मेहता यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, कंगणाबरोबर काम करणे सोपे नाही. ते तुमच्या मानसिक क्षमतेचा कस पाहणारे आहे. तिच्या सोबत मी सिमरन हा चित्रपट मी केला. मात्र त्याचा मला प्रचंड त्रास झाला. ‘हा चित्रपट करुन मी खूप मोठी चुक केली आहे. मी हा चित्रपट करायला नको होता. एक दिग्दर्शक म्हणून हा चित्रपट केल्यानंतर मला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले होते. असे त्यांनी मेहता यांनी म्हटले आहे.

सेटवर जे काही व्हाय़चं त्या सगळ्याचे क्रेडिट कंगणाला हवे असायचे. तिचा मनमानीपणा सुरु असायचा. तिच्याबरोबर 2017 मध्ये केलेल्या त्या चित्रपटामुळे मला अनेक गोष्टी समजल्या. त्यावेळी तिच्यासह काम करणे हा वेदनादायी अनुभव म्हणावा लागेल. सिमरन या चित्रपटाचे लेखक आणि संकलक होते. ते माझे जुने सहकारी. त्यांनी जे कथेला अनुकूल बदल सुचवले त्यासगळ्याचे श्रेय कंगणाने घेतले. आणि त्यांचे त्या चित्रपटाविषयीचे जे व्हिजन होते तेच बदलून टाकले. त्यांच्या मुळ पटकथेत बदल करुन आपल्या म्हणण्यानुसार गोष्टी व्हायला हव्यात असा कंगणाचा अट्टाहास असायचा. चित्रपटाच्या सेटवर कंगना संपूर्ण टीमला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायची. ती सेटवर इतर कलाकारांना देखील सल्ला देत होती’ असेही मेहता यांनी यावेळी सांगितले.

बॉलिवूडमधील एक लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून हंसल मेहता यांची ओळख आहे.  वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक म्हणून ते सर्वांना परिचित आहे.  त्यांना सिमरन चित्रपटाच्या दरम्यान मानसिक त्रास झाला. त्यांनी तो व्यक्त केला आहे.   हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. या चित्रपटाच्या वेळी कंगना आणि त्यांच्यामध्ये वाद देखील झाले होते.नुकतीच हंसल मेहता यांची स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.