रेल्वे स्टेशनवर चक्क कंगणाच देतेय़ तिकीट, पाहा व्हिडीओ !

kangna ranaut issues tickets to railway commuters at railway station
kangna ranaut issues tickets to railway commuters at railway station

मुंबई : बॉलिवूड नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट घेऊन येत असतं. बॉलिवूडची अभिनेत्री कंगणा रणावत चौकटी बाहेरच्या भूमिका साकारत असते. कंगणा नव्या चित्रपटासह सज्ज झाली आहे. तिचा नवा दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पंगा' असं त्या चित्रपटाचं नाव असून टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा एक स्पोटर्स ड्रामा आहे. 

कंगणा नेहमीच अनोख्या भूमिका साकारते आणि 'पंगा' मध्येही ती हटके भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर रिलिज झाले. त्यानंतर कंगणाने टीझरचा व्हिडीओ इन्स्टाग्रावर शेअर केला. यामध्ये काही फोटोस एका अल्बमच्या माध्यामातून दिसत आहेत. एवढचं काय कंगणा आणि चित्रपटाच्या टीमने चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचनंतर आज एका वेगळ्या अंदाजात चित्रपटाचं प्रमोशन केलं. कंगणा चक्क मुंबईतल्या CSMT म्हणजेच ''छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल' या स्टेशनवर तिकिट काऊंटरवर लोकांना तिकिट देताना दिसली. चित्रपटामध्येही तिची काहीशी अशीच भूमिका असणार आहे. हे अनोख्या पद्धतीचं प्रमोशन लोकांना खूपच आवडत आहे. 

'जो सपने देखते हैं वो पंगा लेते हैं। इनकी कहानी हमसे जुड़ी हुई है' अशी दमदार चित्रपटाची टॅगलाइन आहे. कंगणाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. पोस्टरमध्ये कंगणा एका साधारण महिलेसारखी दिसत आहे. हा चित्रपट राष्ट्रीय कब्बडीपट्टूच्या जीवनावर आधारीत असणार आहे. त्यामध्ये कंगणा आईच्या भूमिकते दिसेल. 

कंगणा रणावतसोबत या सिनेमामध्ये पंजाबी गायक जस्सी गील, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी आणि रिचा चढ्ढा ही मंडळी महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. सिनेमाचं दिग्दर्शऩ अश्विनी अय्यर तिवारी यांनी केलं आहे. 'नील बट्टे सन्नाटा' आणि 'बरेली की बर्फी' या चित्रपटांचं दिग्दर्शऩ अश्विनी यांनी केलं आहे. कंगणा आणि दिग्दर्शक अश्विनी यांची चांगली मैत्री आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने त्या एकत्र काम करत आहेत. 

चित्रपट 24 जानेवारी 2020 ला प्रदर्शित होणार आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरील बायोपिकमध्येही कंगना मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर आणि टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com