कपिल शर्माने शेअर केली गुडन्युज, ट्विटमागच्या सिक्रेटचा केला खुलासा

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 5 January 2021

कपिलने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कपिलचा कॉमेडी अंदाज पाहायला मिळतोय. तो auspicious (ऑस्पिशिअस) हा इंग्रजी शब्द व्यवस्थित बोलु शकत नाहीये

मुंबई- कपिल शर्माने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. होय. छोट्या पडद्यावर कॉमेडीची जादू पसरवणारा कपिल शर्मा आता डिजीटलविश्वात पदार्पण करत आहे. कपिलने त्याच्या या प्रोजेक्टचा छोटासा व्हिडिओ शेअर करत 'शुभ समाचार' वाल्या बातमीचा खुलासा केला आहे. नुकतंच कपिलने याबाबतचं ट्विट सोशल मिडियावर शेअर केलं आहे.  

हे ही वाचा: 'कुछ कुछ होता है' फेम छोटा सरदार परझान अडकला विवाहबंधनात, पारसी रितीरिवाजात केलं लग्न

कपिल शर्माने ४ जानेवारीला एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्याने म्हटलं होतं की, ''उद्या मी तुमच्यासोबत एक शुभ समाचार म्हणजेच auspicious news शेअर करणार आहे.' या ट्विटच्या आधी कपिलने स्वतःच एक प्रश्न विचारणारं ट्विट केलं होतं. 'शुभ समाचारला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? कृपया सांगा.'' आता याच ट्विटमध्ये लपलेला auspicious news चा नवीन प्रोजेक्ट त्याने सगळ्यांसमोर सादर केला आहे.  लवकरंच नेटफ्लिक्सवर याचं टेलीकास्ट होणार आहे. 

कपिलने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कपिलचा कॉमेडी अंदाज पाहायला मिळतोय. तो auspicious (ऑस्पिशिअस) हा इंग्रजी शब्द व्यवस्थित बोलु शकत नाहीये आणि ते बोलण्याची तो प्रॅक्टीस करत आहे. कॅमेरासमोर आल्यानंतर तो स्क्रीप्ट वाचतो आणि जसं auspicious शब्द उच्चारण्याची वेळ येते तो अडखळतो. दिग्दर्शक त्याला सांगतात की हे हिंदीमध्ये देखील केलं जाऊ शकतं. दिग्दर्शक असं बोलल्यानंतर कपिल म्हणतो की, ''तशी तर माझी इंग्रजीमध्ये करण्याची तयारी होती मात्र नेटफ्लिक्स स्वतःच देसी आहे तर मग काय गरज आहे जबरदस्ती इंग्रजी बोलण्याची. तेव्हा मी येत आहे तुमच्या टीव्ही, लॅपटॉप आणि फोनवर. हीच auspicious news होती.'' हे सांगताना मात्र तो यावेळी हा शब्द बरोबर उच्चारतो आणि व्यवस्थित इंग्रजी बोलतो. 

कपिलच्या या आधीच्या ट्विटवरुन अनेक युजर्सनी अंदाज लावला होता की तो कदाचित डिजीटलवर पदार्पण करत आहे. तर काहींनी म्हटलं होतं की 'शुभ समाचार' नावाने त्याचा नवीन प्रोजेक्ट येत असेल. त्यामुळे कपिलचं हे नुकतंच केलेलं ट्विट पाहुन युजर्सनी योग्य अंदाज वर्तवल्याचं दिसतंय.   

kapil sharma shares good news soon to be seen on netflix  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kapil sharma shares good news soon to be seen on netflix