अति शहाणा त्याचा ... 

संकलन - भक्ती परब. 
सोमवार, 27 मार्च 2017

अति शहाणा त्याचा... पुढे सर्वांना माहितच आहे काय होतं ते. तेच सध्या कपिल शर्माच्या बाबतीत होतंय. गेल्या वर्षी 23 एप्रिलला धुमधडाक्‍यात सुरू झालेला द कपिल शर्मा शो आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण नेहमीचंच दिलं जातंय. काही दिवसांपासून कार्यक्रमातील सर्व कलाकारांची आपापसातील गटबाजी, भांडणं समोर आल्यानंतर या कार्यक्रमाचा टीआरपी घसरू लागला आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉलिवूडकर मंडळी सेटवर आली की, कपिलच्या बोलण्याने (विनोदी शैलीने?) ते हैराण व्हायचे; पण बिचारे प्रमोशनला आलेले असल्यामुळे काहीच बोलत नसत. कपिलचा विनोद मुक्‍याट्याने सहन करत.

अति शहाणा त्याचा... पुढे सर्वांना माहितच आहे काय होतं ते. तेच सध्या कपिल शर्माच्या बाबतीत होतंय. गेल्या वर्षी 23 एप्रिलला धुमधडाक्‍यात सुरू झालेला द कपिल शर्मा शो आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण नेहमीचंच दिलं जातंय. काही दिवसांपासून कार्यक्रमातील सर्व कलाकारांची आपापसातील गटबाजी, भांडणं समोर आल्यानंतर या कार्यक्रमाचा टीआरपी घसरू लागला आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉलिवूडकर मंडळी सेटवर आली की, कपिलच्या बोलण्याने (विनोदी शैलीने?) ते हैराण व्हायचे; पण बिचारे प्रमोशनला आलेले असल्यामुळे काहीच बोलत नसत. कपिलचा विनोद मुक्‍याट्याने सहन करत. आताही बॉलिवूडकर मंडळींची कपिल शर्मा प्रकरणावर बोलती बंदच आहे. ज्या दिवशी कपिल आणि त्याचे गोंधळी विनोदवीर यांच्यात तडतड सुरू झाली. त्या वेळी नेमकी "नाम शबाना' या सिनेमाची टीम प्रमोशनला येणार असल्याची चर्चा होती; पण शूट झालं नाही. काहीजणं म्हणतात त्या दिवशी शूट स्वतः कपिलनेच बंद केलं... सगळीच नुसती उडती हवा... या सगळ्या गोष्टी कपिलच्या मीपणामुळे वाढत चालल्या आहेत. अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. सोनी वाहिनीसोबत 106 करोडचा करार झालेला असताना कपिलचं हे वागणं आता वाहिनी सहन करू शकत नाही. प्रतिस्पर्धी वाहिन्यांना शह देण्यासाठी कपिलचा मीपणा आजवर सोनी वहिनीने सहन केला असावा; पण सहनशीलतेला अंत असतोच ना... आता तर कपिल सोनी वाहिनीसाठी नाकापेक्षा मोती जड होऊन बसलाय, असं एकंदरीत प्रकरणावरून दिसतंय. आणि कपिलचे हे नखरे कशाच्या जिवावर सुरू आहेत, तर म्हणे तो राजीव धिंग्रा यांच्या फिरंगी नावाचा विनोदी सिनेमात काम करतोय... अभिनय हा अभिनय असतो त्यात मालिका काय किंवा सिनेमा काय. दोन्ही माध्यमं तितकीच ताकदीची आहेत; पण हे सिनेमाचं वेड लागलेल्या कपिलला कोण समजावणार... 
 

Web Title: The Kapil Sharma Show to go off air?