पंतप्रधान झाल्यावर बाहुबली प्रभासला करायचंय 'हे' महत्वाचं काम (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
Friday, 23 August 2019

कपिलनं प्रभासला शोमध्ये अनेक गंमतीशीर प्रश्न विचारले. यातील एक प्रश्न असा होता की, एका दिवसासाठी तुला पंतप्रधान केलं गेलं तर तु सर्वात आधी काय करशील? हा प्रश्न ऐकल्यावर एक मिनिटही न थांबता प्रभास म्हणाला, मी इंडस्ट्रीमधील मुलाखती बंद करेन. प्रभासचं हे उत्तर ऐकून खुद्द कपिल सुद्ध स्वतःला हसण्यापासून थांबवू शकला नाही.

मुंबई : कधी कोणाला काय बनण्याची संधी मिळेल सांगता येत नाही. असंच बाहुबली सुपरस्टार प्रभासला जर पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली तर त्याला पहिलं काम काय करायचं आहे याचा उलगडा त्याने द कपिल शर्मा शोमध्ये केला आहे. प्रभासची धम्माल या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात सर्वांच्याच गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता प्रभास शोमध्ये हजेरी लावणार आहे.

कपिलनं प्रभासला शोमध्ये अनेक गंमतीशीर प्रश्न विचारले. यातील एक प्रश्न असा होता की, एका दिवसासाठी तुला पंतप्रधान केलं गेलं तर तु सर्वात आधी काय करशील? हा प्रश्न ऐकल्यावर एक मिनिटही न थांबता प्रभास म्हणाला, मी इंडस्ट्रीमधील मुलाखती बंद करेन. प्रभासचं हे उत्तर ऐकून खुद्द कपिल सुद्ध स्वतःला हसण्यापासून थांबवू शकला नाही.

दरम्यान, कपिलनं सिनेमांव्यतिरिक्त इतर वेळी फार कमी बोलणाऱ्या प्रभास शोमध्ये मात्र चांगलंच हसवलं. मागच्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असेलेला 'साहो' सिनेमा येत्या 30 ऑगस्टला रिलीज होत असून त्याआधी 'साहो'ची स्टार कास्ट अगदी धडाक्यात सिनेमाचं प्रमोशन करण्यात बीझी आहेत. यासाठी प्रभासनं कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in kapil sharma show prabhas reply on one day pm