'घरात माझी काही इज्जतंच नाहीये..', वरुण धवनचा 'द कपिल शर्मा शो'मध्ये खुलासा

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 24 December 2020

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान ही जोडी या शोमध्ये त्यांच्या आगामी 'कुली नंबर १' या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी येणार आहे. या दोन कलाकारांव्यतिरिक्त सेटवर जावेद जाफरी आणि जॉनी लीवर देखील दिसतील.

मुंबई- 'द कपिल शर्मा शो'मध्ये या आठवड्यात ख्रिसमसचं सेलिब्रेशन होणार आहे. शोच्या या आठवड्याच्या एपिसोडमध्ये हे सेलिब्रेशन आणखी खास बनवण्यासाठी गेस्ट म्हणून येणार आहेत अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान. ही जोडी या शोमध्ये त्यांच्या आगामी 'कुली नंबर १' या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी येणार आहे. या दोन कलाकारांव्यतिरिक्त सेटवर जावेद जाफरी आणि जॉनी लीवर देखील दिसतील. या एपिसोडचे प्रोमो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. 

हे ही वाचा: मुंबई क्लबमध्ये केलेल्या छापेमारीत गुरु रांधवाला झाली होती अटक, म्हणाला ''नकळत चूक झाली..''

'द कपिल शर्मा शो'च्या या एपिसोडच्या प्रोमोमध्ये कपिल या कलाकारांसोबत मस्ती करताना दिसतोय. कपिल सारा अली खानला विचारतो की यावर्षी तिने 'लव आज कल' आणि 'कुली नंबर १' हे सिनेमे केले आहेत तेव्हा तिचे आणखी किती सिनेमांचे रिमेक बनवण्याची डिल आहे? यावर उत्तर देताना सारा अली खान सांगते की 'यासाठीच मी लपून छपून शूट केलं आहे.' त्यावर कपिल तिची मस्करी करत म्हणतो 'का? हे सिनेमे अडल्ट सिनेमे होते का?' कपिलच्या या प्रश्नावर सेटवर उपस्थित सगळ्यांमध्ये हशा पिकतो. 

तर दुसरीकडे कपिल वरुण धवनची मस्करी करण्यामध्ये देखील कमी पडत नाही. कपिल वरुणची मस्करी करत म्हणतो की, 'तू सिनेमात सामान उचलत असतोस तर मग घरी देखील तू कधी सिलेंडर इकडून तिकडे उचलून ठेवतोस का?' यावर उत्तर देताना वरुण म्हणतो, 'घरात माझी काही इज्जतंच नाहीये, माझा भाऊ मला खूप हैराण करतो. भाऊ आला आहे. दर आणखी कोणत्या सिनेमाचं काम आलं तर तो झटकून लावतो.' वरुण सांगतो की 'तो दिग्दर्शक असला म्हणून काय झालं पण मी मुर्ख थोडी ना आहे.'

अभिनेत्री सारा अली खान कार्तिक आर्यनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. या शो दरम्यान सारा मजेत म्हणाली की 'जो पण मला डेटवर घेऊन जातो तो नंतर पळून जातो.' 'लव आज कल' या सिनेमात सारा आणि कार्तिकने एकमेकांसोबत काम केलं होतं.   

the kapil sharma show varun dhawan and sara ali khan coolie no 1 promotion christmas celebration  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the kapil sharma show varun dhawan and sara ali khan coolie no 1 promotion christmas celebration