अनुपम खेर यांनी दिलेली अनोखी भेट पाहून कपिल शर्मा झाला भावूक

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 3 December 2020

अनुपम खेर अभिनयासोबतच लेखक म्हणूनही तितकेच प्रसिद्ध आहेत. नुकतंच त्यांचं ‘अनुपम खेर – युअर बेस्ट डे इज टुडे’ हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकाची एक कॉपी त्यांनी प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माला भेट म्हणून दिली आहे.

मुंबई- अभिनेते अनुपम खेर गेली तीन दशक सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. सोशल मिडियावरही ते तितकेच ऍक्टीव्ह असतात. अनेकदा सोशल मिडियावर ते चालु घडामोडींवर त्यांचं परखड मत मांडताना दिसतात. अनुपम खेर अभिनयासोबतच लेखक म्हणूनही तितकेच प्रसिद्ध आहेत. नुकतंच त्यांचं ‘अनुपम खेर – युअर बेस्ट डे इज टुडे’ हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकाची एक कॉपी त्यांनी प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माला भेट म्हणून दिली आहे.

हे ही वाचा: अभिषेक बॅनर्जीच्या पाशची उत्तम कामगिरी,ऑस्करच्या शर्यतीत समावेश    

अनुपम खेर यांनी त्यांच्या पुस्तकाचं प्रमोशन करण्याच्या निमित्तानं 'द कपिल शर्मा' शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी हे पुस्तक कपिल शर्माला भेट म्हणून दिलं. हे गिफ्ट पाहून कपिलला खूप आनंद झाला. कपिलने म्हटलंय, “या पुस्तकासाठी धन्यवाद अनुपम सर. तुम्ही या पुस्तकावर माझी आई, पत्नी आणि मुलीचं नाव लिहिलं आहे. ते फार छान दिसतंय. ही नावं वाचून माझे कुटुंबीय खूप आनंदी झाले आहेत. अनायरा देखील मोठी झाल्यावर खूप आनंदी होईल.” अशी पोस्ट लिहून कपिलनं या अनोख्या भेटीसाठी अनुपम खेर यांचे आभार मानले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिलची ही पोस्ट वाचून अनेकांनी या पुस्तकाच्या पोस्टवर कमेंट केली आहे. 
  

kapil sharma thanks anupam kher for a beautiful gift and commends his thoughtfulness  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kapil sharma thanks anupam kher for a beautiful gift and commends his thoughtfulness