KARACHI TO NOIDA Trailer : 'पाकिस्तानी एजंट की भारताची गुप्तहेर'? सीमा हैदरच्या 'कराची टू नोयडा' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर

सीमा हैदर ही तिच्या प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आल्याचे सांगितले जाते.
Karachi to Noida Trailer
Karachi to Noida Traileresakal

Karachi to Noida Trailer : ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत आहेत त्या कराची टू नोएडाचा ट्रेलर आता समोर आला आहे. सीमा हैदर हा विषय या चित्रपटाचा मध्यबिंदू आहे. गेल्या काही दिवसांपासून हा सीमा हैदरवरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले आहे.

टीव्ही मनोरंजन क्षेत्र असो किंवा सोशल मीडिया या सगळ्यांना सीमा हैदर नावाच्या व्यक्तीनं भुरळ घातली होती. बॉलीवूडच्या मेकर्सला सीमा हैदर या विषयावर चित्रपटाची निर्मिती करावी असे वाटले आणि त्यांनी कराची टू नोएडा नावाच्या चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला. आता त्याचा ट्रेलर समोर आला असून त्याची जोरदार चर्चा आहे.

झोप उडवणारी टेक्नॉलॉजीच मिळवून देणार 'स्मार्ट झोप'..!!

सीमा हैदर नेमका विषय आहे काय?

सीमा हैदर ही तिच्या प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सीमा ही खरचं सामान्य मुलगी आहे की, ती पाकिस्तानी गुप्तहेर आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता. दोन आठवड्यांहून अधिक काळ सीमा ही बातम्यांचा विषय होती. त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियांना देखील उधाण आले होते. आता सीमाच्या आयुष्यावर आधारित आलेल्या चित्रपटानं अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.

सीमा पाकिस्तानमधून का आली आहे, तिच्या भारतात येण्यामागील उद्देश काय आहे याचा शोध अजून सुरु आहे. असे त्या ट्रेलरमध्ये योगी आदित्यनाथ सांगतात. दुसरीकडे लालुप्रसाद यादव हे देखील एका न्युज चॅनेलमध्ये डिबेटमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी देखील या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे कराची टू नोएडा हा चित्रपट राजकीय चित्रपट म्हणूनही ओळखला जाणार आहे.

Karachi to Noida Trailer
Ganpath Twitter Review: गणपत'मधून टायगर फॉर्ममध्ये आला की फ्लॉप झाला, नेटकऱ्यांची काय मतं...

सीमा जेव्हा भारतात आली होती तेव्हा तिच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. पोलिसांनी जो तपास केला त्यातून कोणताही ठोस नित्कर्ष समोर आलेला नाही. त्यामुळे भारतीय इंटेलिजन्सकडून तपास सुरु करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सीमा ही ग्रेटर नोएडामध्ये तिच्या सासरच्या लोकांसमवेत राहते. तिची आणि सचिनची ओळख पब्जी गेमच्या माध्यमातून झाली होती.

Karachi to Noida Trailer
Leo Twitter Review: काहींना आवडला तर काहींची नाराजी, विजयचा लिओ सिनेमा कसा आहे? जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com