करण जोहर असला म्हणून काय झालं, रांगेत उभा राहा! विमानतळावर...| Karan Johar trolled | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karan Johar

Karan Johar : करण जोहर असला म्हणून काय झालं, रांगेत उभा राहा! विमानतळावर...

Karan Johar bollywood producer trolled mumbai airport : बॉलीवूडचा निर्माता, दिग्दर्शक करण जोहर हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या वक्तव्यांसाठी ओळखला जातो. परखड वक्तव्य करण्यातही करण हा बऱ्याचदा चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर करण चर्चेत आला आहे. बॉलीवूडचे सेलिब्रेटी हे अनेकदा नियम मोडत असल्याचे दिसून आले आहे. खासकरुन मुंबई विमानतळावर देखील याविषयीच्या घटना समोर आल्या आहेत.

असाच एक प्रसंग करण जोहरच्याबाबत घडला आहे. मुंबई विमानतळावर सिक्युरिटी लाईन ब्रेक करुन करण पुढे जाण्याच्या तयारीत होता. अशावेळी त्याला सुरक्षारक्षकांनी लाईनमध्ये येण्याची विनंती केली. तो व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा मात्र त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. करण तू असा कसा वागू शकतोस ते करण तुझ्यासाठी काही वेगळे नियम नाहीत. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

करणला सुरक्षारक्षकांनी त्याचे तिकिट आणि बोर्डिंगपास विषयी विचारले होते. ते न दाखवता तो थेट विमानतळात शिरल्यानंतर त्याला विचारणा झाली होती. सोशल मीडियावरुन करणला नेटकऱ्यांनी छळण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येकवेळी आपण कोण वेगळे आहोत हे दाखवायला हवेच का, सर्वसामान्य लोकांसारखे राहू शकत नाही का, असा प्रश्न करणला नेटकऱ्यांनी विचारला आहे.

यापूर्वी देखील करण वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. वेगळी भूमिका आणि ठामपणे आपले मत प्रदर्शित करणे यामुळे करणला नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. गेल्या वर्षापासून करण जोहरला बॉक्स ऑफिसवर संमिश्र यश मिळताना दिसत आहे. मात्र जेव्हा त्याची निर्मिती असलेला ब्रम्हास्त्र प्रदर्शित झाला तेव्हा त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.