'गे' म्हणण्यावरून भडकला करण जाेहर, दिले सडेतोड उत्तर

वृत्तसंस्था
Monday, 19 August 2019

बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय निर्माता म्हणजे करण जोहर हाेय. त्याने अनेक नव्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं आहे. अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात करणाऱ्या करणनं नंतर निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत त्यात प्रचंड यशही मिळवलं. करणला एका युजरनं ट्विटरवर एक पोस्ट करत ट्रोल करायचा प्रयत्न केला. त्या  युजरला करणनं सडेताेड उत्तर दिले आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय निर्माता म्हणजे करण जोहर हाेय. त्याने अनेक नव्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं आहे. अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात करणाऱ्या करणनं नंतर निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत त्यात प्रचंड यशही मिळवलं. करणला एका युजरनं ट्विटरवर एक पोस्ट करत ट्रोल करायचा प्रयत्न केला. त्या  युजरला करणनं सडेताेड उत्तर दिले आहे.

दरम्यान, अनेकदा करणला त्याच्या लैंगिकतेवरून ट्रोल व्हावं लागतं. अनेकदा करण या सर्व गोष्टीवर दुर्लक्ष करताना दिसतो. पण नुकतंच एका युजरनं अशाप्रकारे त्याला ट्रोल करायचा प्रयत्न केला त्यावर मात्र करणनं त्याला सडेतोड उत्तर दिलं. ज्यामुळे त्याचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

करणला एका युजरनं ट्विटर एक पोस्ट करत ट्रोल करायचा प्रयत्न केला. त्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, करण तुझ्यावर एक सिनेमा तयार करायला हवा, 'करण जोहर : द गे' हे ट्वीट पाहिल्यावर करण जोहर भडकला पण तरीही त्यानं संयम राखत या युजरला उपरोधिक शब्दात सडेतोड उत्तर दिलं. करणनं त्याच्या ट्वीटला रिप्लाय देताना लिहिलं, 'तू खरंच जिनिअस आहेस. या विषयी ट्विटरवरून आवाज उठवल्याबद्दल तुझे आभार' करणला याबद्दल ट्वीटर युजर्सनी पाठिंबा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karan johar slam troller who raise question on his sexuality