
करण लॉकडाऊन सुरु झाल्यापासून त्याच्या जुडवा मुलांसोबतचे व्हिडिओ पोस्ट करत असतो..या व्हिडिओंमध्ये त्याची मुलं अनेकदा त्याच्या पसंतीवर खिल्ली उडवताना दिसतात..नुकताच करण 'लॉकडाऊन विथ जोहर्स'च्या दुस-या सिझनमधला दुसरा एपिसोड घेऊन आला आहे..यावेळी या एपिसोडला म्युझिकल टच देखील होता..
मुंबई- लॉकडाऊनमध्ये सध्या सगळेच कलाकार घरात बसून जे काही करत आहेत त्याचे फोटो-व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी पोस्ट करताना दिसत आहेत..यात काहीजण प्रेक्षकांचा मूड हलका करण्यासाठी मजेशीर व्हिडिओ शेअर करतात...यातलंच एक नाव म्हणजेसिनेदिग्दर्शक करण जोहर..करण लॉकडाऊन सुरु झाल्यापासून त्याच्या जुडवा मुलांसोबतचे व्हिडिओ पोस्ट करत असतो..या व्हिडिओंमध्ये त्याची मुलं अनेकदा त्याच्या पसंतीवर खिल्ली उडवताना दिसतात..नुकताच करण 'लॉकडाऊन विथ जोहर्स'च्या दुस-या सिझनमधला दुसरा एपिसोड घेऊन आला आहे..यावेळी या एपिसोडला म्युझिकल टच देखील होता..
हे ही वाचा: लता मंगेशकर यांचा पुतण्या बैजु मंगेशकरने कोरोनावर बनवलेलं हे गाणं पाहिलं का?
करणने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याची जुडवा मुलं यश आणि रुही गायक बनून अवतरले होते..या व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांच्या हातात गिटार पाहु शकता..या व्हिडिओच्या सुरुवातीला करण बोलतोय, ''बहिण-भावांनो आमच्या घरात अतिशय प्रतिभावान संगीतकार अवतरले आहेत..रुही आणि यश..आता तुम्ही हार मानण्यासाठी तयार रहा..असं म्हटल्यानंतर यश आणि रुही गाणं म्हणायला सुरुवात करतात..
यश आणि रुहीचं हे अतरंगी गाणं ऐकून करणला हस्तक्षेप करावा लागतो..कारण त्याला त्यांचं हे गाणं आवडत नाही..करण त्याच्या मुलांना सांगतो, वेळ संपली, वेळ संपली..तुमच्याकडे याव्यतिरिक्त चांगलं गाणं गाण्यासाठी आहे का?
दोन्ही मुलं हे ऐकण्यासाठी थांबतात आणि मग पुन्हा त्यांच्या अवतारात येऊन जोरजोराने गाणं गात राहतात..त्यानंतर मग करण त्याच्या आवडता शब्द टोडल म्हणत हा व्हिडिओ बंद करतो..हा व्हिडिओ पोस्ट करताना करण लिहितो की, 'हे स्पष्ट आहे की गाणं आमच्या रक्तात नाही त्यासाठी आधीच माफी'
करण अनेकदा त्याच्या मुलांना ज्या गोष्टी विचारतो तेव्हा त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळीच उत्तरं मिळतात..आणि सध्या लॉकडाऊनमध्ये करणच्या या जुडवा मुलांचे व्हिडिओ प्रेक्षक खुपंच पसंत करतात..इतकंच नाही हे क्युट व्हिडिओ व्हायरल देखील होत आहेत..
karan johar twin kids yash and ruhi singing song video goes viral