मादाम तुसाँ संग्रहालयात करण जोहरचा मेणाचा पुतळा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 एप्रिल 2019

मुंबई - सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. खुद्द करण जोहरच्या हस्ते या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. 

करण जोहर बॉलिवूडमधील पहिला दिग्दर्शक आहे ज्याचा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या अनावरणासाठी करणची आई देखील उपस्थित होती. करणने पुतळ्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

काळ्या रंगाचा कोट आणि सेल्फी घेतानाच्या पोजमध्ये करणचा हा पुतळा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karan Johars wax statue at Madame Tussauds