
मुंबई ः कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये मदत करण्यास संपूर्ण कलाविश्व पुढे सरसावलं. आणि अजूनही हा मदतीचा ओघ सुरुच आहे. या लढाईमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लढणाऱ्या साऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी कलाकार पुढे आले आहेत. त्याचप्रमाणे कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात कोणी उपाशी पोटी झोपू नये म्हणून देखील कलाकारांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोणत्या ना कोणत्या संस्थेची मदत घेत आपापल्या परीने कलाकार अन्नदान करत आहेत. देशभरात निर्माण झालेल्या या कठीण परिस्थितीमध्ये खरं तर एकात्मतेचं दर्शन घडत आहे. यामध्ये विशेष कौतुक वाटतं ते अभिनेता करणवीर बोहराचं.
करणवीर म्हणजे छोट्या पडद्यावरील एक सुप्रसिद्ध नाव. तो सध्या करत असलेलं काम इतरांना अभिमान वाटेल असंच आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये तो त्याच्या कुटुंबियांबरोबर उतरला आहे. म्हणजेच नेहमी तो 100 गरजूंसाठी नाश्ताची सोय करतो.
पण हा नाश्ता कुठून बाहेरुनही मागवला जात नाही किंवा कोणती संस्था पुरवत नाही. हा नाश्ता करणवीर स्वतः आणि त्याचे कुटुंबिय मिळून दररोज बनवतात. आणि त्यानंतर एका बंद पॅकेटमध्ये हा नाश्ता पॅक केला जातो. आणि ही मंडळी स्वतः जाऊन हा नाश्ता गरजूंना देतात. करणवीरने लॉकडाऊनमध्ये हा नवा उपक्रम सुरु केला आहे. एकमेकां सहाय्य करु...असे म्हणत करणवीरची दिवसाची सुरुवातच नाश्ता बनवण्यापासून होते. त्याने स्वतःच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत सांगितले आहे. 'सकाळी 8 वाजता नाश्ता करायला सुरुवात होते. दिवसाची सुरुवातच यापासून होते.
जवळपास 100 गरजूंना नेहमीचा नाश्ता पुरवला जातो.' असे करणवीर म्हणतो. करणवीरची पत्नी रोजाना या सारा नाश्ता तयार करते आणि करणवीर त्याला मदत करतो. करणवीरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नाश्ता तयार करतानाचे फोटो देखील शेअर केले आहेत. यामध्ये त्याच्या दोन क्युट मुली देखील दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात मिळालेला वेळ आपण गरजूंसाठी खर्च करावा असे करणवीरचे प्रामाणिक मत आहे. एकमेकांना मदत केली, कठीण प्रसंगामध्ये एकत्र राहिलो की आपण ही लढाई लवकरच जिंकू, असेही करणवीरचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्याने हा नवा आणि हटके उपक्रम हाती घेतला आहे. करणवीरचा हा नवा उपक्रम खरंच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.
karanvir bohra feeding 100 people daily praising social media
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.