Video : 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? मराठी अभिनेत्रीसोबत धक्कादायक घटना

स्वाती वेमूल
Sunday, 28 February 2021

'कारभारी लयभारी' या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला मुंबईत त्या भयानक घटनेला सामोरं जावं लागलं.

'डान्सिंग क्वीन' या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गंगा हिला मुंबईत एका भयानक घटनेला सामोरं जावं लागलं. गंगा ही ट्रान्सजेंडर असून प्रणित हाटे असं तिचं मूळ नाव आहे. आपल्या एका मित्राला गावी सोडायला गेली असताना मुंबईतील घाटकोपर परिसरात तिला एका व्यक्तीकडून भररस्त्यात मारहाण करण्यात आली. या प्रसंगानंतर गंगाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच मुंबई पोलीस गंगाच्या मदतीला धावून आले आणि संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

२५ फेब्रुवारी रोजी नेमकं काय घडलं आणि त्या व्यक्तीने गंगाला का मारहाण केली, याबाबत तिने सकाळ ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत सविस्तरपणे सांगितलं. त्याचसोबत तिने मुंबई पोलिसांचेही आभार मानले.

हेही वाचा : 'देव तुमच्यावर ही वेळ आणू नये'; लग्नाबद्दल विचारणाऱ्यांना अभिज्ञा भावेचं उत्तर 

गंगा सध्या झी मराठी वाहिनीवरील 'कारभारी लयभारी' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. 'डान्सिंग क्वीन' या रिअॅलिटी शोमुळे ती घराघरात पोहोचली. तिचा प्रणितपासून गंगा बनण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. याआधीही अशा अनेक घटनांना सामोरं गेल्याचं ती सांगते. त्याचसोबत अशा घटनांमुळे खचून न जाता आवाज उठवण्याचं आवाहन ती तिच्या चाहत्यांना करतेय. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karbhari laybhari actress ganga aka pranit hate interview about incident in mumbai