esakal | नवा पाहुणा येताच सैफ-करीनाने घेतली आलिशान गाडी; किंमत वाचून व्हाल थक्क!
sakal

बोलून बातमी शोधा

saif kareena

या गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

नवा पाहुणा येताच सैफ-करीनाने घेतली आलिशान गाडी; किंमत वाचून व्हाल थक्क!

sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॉलिवूडमध्ये सध्या सर्वांत चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान. करीनाने नुकताच दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. सैफ-करीनाच्या घरी आता आणखी एका नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे. पण हा पाहुणा म्हणजे कोणी एखादी व्यक्ती नसून अत्यंत महागडी मर्सिडीज कार आहे. सैफने नुकतीच ही नवीन गाडी विकत घेतली असून त्याची किंमत वाचून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. 

सैफने घेतलेली ही गाडी मर्सिडीज बेंज जी क्लास v8 biturbo आहे. मंगळवारी सैफ आणि करीनाला या आलिशान गाडीतून फिरताना पाहिलं गेलं. याचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या गाडीची शोरुम किंमत जवळपास १.६२ कोटी रुपये इतकी आहे. गरोदरपणानंतर करीनाला पहिल्यांदाच घराबाहेर पडली आणि तेव्हा या दोघांचे फोटो पापाराझींनी काढले. 

जागतिक महिला दिनाच्या निमित्त करीनाने तिच्या दुसऱ्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र या फोटोमध्ये मुलाचा चेहरा पाहायला मिळत नाही. २१ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. या मुलाचं नाव अद्याप दोघांनीही जाहीर केलं नाही. पहिल्या मुलाचं नाव तैमुर असं ठेवल्यानंतर आता सैफ-करीना त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव काय ठेवणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या नवीन पाहुण्याच्या आगमनाआधी सैफ-करीना नवीन घरात शिफ्ट झाले. या नवीन घरात तैमुरसाठी नर्सरी आणि सैफसाठी लायब्ररीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 
 
 

loading image