'वन नाईट स्टॅंड' च्या करीनाच्या प्रश्नावर साराचं 'हे' उत्तर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

साराने करीनाचा रेडिओ शो "वॉट वूमन वॉंट'' यामध्ये नुकतीच हजेरी लावली होती. या शोमध्ये दोघीही सुंदर आउटफिटमध्ये दिसत आहेत. त्यांच्यामध्ये अनेक गप्पा झाल्या. या कार्यक्रमादरम्यान करीनाने साराला वन नाईट स्टॅंडविषयी सवाल केला.

मुंबई : सारा अली खानने काही वेळ्तच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. केदारनाथ आणि सिंबा हे दोन चित्रपट तिने केले आणि दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरले. साराचे आई वडील दोघेही सेलिब्रिटी आहेत आणि तरीही साराने स्वत:ला सिद्ध केलं आहे. सारा वैयक्तिक आयुष्यातही जॉली व्यक्ती आहे. नुकतीच तीने एक मुलाखत दिली आणि तिही एका खास व्यक्तीला ! दुसरं तिसरं कोणी नाही तर सारान मुलाखत दिली आहे करीना कपूर खानला. यामध्ये करीनाने तिला एक प्रश्न विचारला त्यावर साराने कशी रिअॅक्शन दिली आहे जाणून घ्या.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Wishing you very good luck for your upcoming movie @saraalikhan95 #whatwomenwantseason2 @dotheishqbaby

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

बेबो जरी साराची सावत्र आई असली त्यांचं नातं आईपेक्षा मैत्रीण म्हणून जास्त फ्रॅंक आहे. 'कॉफी विथ करण' मध्ये करीनाने खुलासा केला होता की, सारा तिला नावानेच हाक मारते. आईपेक्षा ती तिला मैत्रीण मानते.

साराने करीनाचा रेडिओ शो "वॉट वूमन वॉंट'' यामध्ये नुकतीच हजेरी लावली होती. या शोमध्ये दोघीही सुंदर आउटफिटमध्ये दिसत आहेत. त्यांच्यामध्ये अनेक गप्पा झाल्या. या कार्यक्रमादरम्यान करीनाने साराला वन नाईट स्टॅंडविषयी सवाल केला. त्यावर सारानेही बिनधास्तपणे उत्तर दिलं आहे. 

करीनाने विचारले 'वन नाईट स्टॅण्डबाबत तुझा विचार काय आहे?'. या प्रश्नावर उत्तर देताना सारा म्हणाली, 'नाही. मी हे अजिबात करु शकत नाही'. त्यापुढे  करीना 'तु प्रियकराला खट्याळ विनोद पाठवतेस का?' असे विचारले. त्यावर सारा म्हणाली, ''हो, मी असे विनोद पाठवते''. कामाव्यतीरीक्त पर्सनल लाइफविषयी सारा अगदी खुलेपणाने बोलली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

अमृता आणि सैफने 1991 मध्ये लग्न केलं. अमृता सिंग सैफपेक्षा वयाने मोठी आहे. पण, हा संसार फार काळ टिकला नाही आणि 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 2012 मध्ये करीना कपूर आणि सैफ विवाहबंधनात अडकले. करीना तिची सावत्र आई असली तरी त्यांच्यामध्ये मैत्रीचं नात आहे. सारा आणि तिचा भाऊ इब्राहिमसोबत आई अमृतासोबत राहते. पण, अनेकदा सारा आणि इब्राहिम करीना, तैमुरसोबत वेळ घालवताना दिसतात. 

सारा आणि कार्तिक आर्यन यांचा 'लव्ह आज कल' हा सिनेमा व्हॅलेनटाइन डे ला म्हणजेच 14 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kareena Kapoor asks Sara Ali Khan if she has had a one night stand