esakal | 'बेबो' करिनाची इन्स्टाग्रामवर धडाक्यात एन्ट्री

बोलून बातमी शोधा

'बेबो' करिनाची इन्स्टाग्रामवर धडाक्यात एन्ट्री}

- जवळपास सगळेच सेलिब्रेटी आहेत इन्स्टाग्रामवर सक्रिय.

'बेबो' करिनाची इन्स्टाग्रामवर धडाक्यात एन्ट्री
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : सध्याच्या काळात बरेचशे लोक हे सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. कोण, कुठे, काय करतयं या सगळ्याची माहिती सोशल मीडियावरून मिळत असते. यामध्ये सेलिब्रेटी ही मागे राहिलेले नाहीत. तेही सोशल मीडियावर सतत काहीतरी पोस्ट करत आपल्या चाहत्यांना माहिती देत असतात. पण, काही कलाकार आजही या सोशल मीडियापासून दूर आहेत. त्यात करिना कपूरचा सोशल मीडियावर प्रेझेन्स नसणं सगळ्यांनाच खटकत होतं. पण, आता तिनं इन्स्टाग्रामवर धडाक्या एन्ट्री घेतलीय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जवळपास सगळेच सेलिब्रेटी इन्स्टाग्रामवर सक्रिय आहेत. आतापर्यंत त्याला अपवाद ठरलेली एक सेलिब्रेटी आहे, ती म्हणजे अभिनेत्री करिना कपूर खान. बॉलिवूडमध्ये इतकी वर्षे अभिनयात यश मिळाल्यानंतरही ती इन्स्टाग्रामपासून लांब होती. बरेच वर्ष सोशल मिडियापासून लांब राहिल्यानंतर आता तिने इन्स्टाग्रामवर तिचं अकाऊंट तयार केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एन्ट्री करताच तिला 630 हजार चाहत्यांनी फॉलो केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. बेबोचे चाहते तिने इन्स्टाग्रावर पदार्पण केल्याने फारच आनंदी आहेत आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 


करिना कपूर या सोसळ मिडिया एन्ट्रीच्या माध्यमातून, करिना कपूरनं जगातील प्रसिद्ध पुमाची ब्रँड ऍम्बॅसेडर होण्याचा मान मिळवलाय. करिनानं या अकाऊंटवर काल Comming Soon म्हणत एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यानंतर तिनं आपला एक फोटो शेअर केला आणि त्यात तिनं पुमाचा लोगा एस्टॅबलिश करण्याचा प्रयत्न केलाय. तिच्या कानातला दागिना लक्षवेधून घेताना दिसत आहे