esakal | करिना कपूरचा चुलत भाऊ अरमान जैनच्या घरी ईडीची धाड
sakal

बोलून बातमी शोधा

armaan jain

एकीकडे राजीव कपूर यांच्या निधनाचे वृत्त असताना दुसरीकडे अरमानच्या घरी ईडी धाड

करिना कपूरचा चुलत भाऊ अरमान जैनच्या घरी ईडीची धाड

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री करिना कपूर, करिश्मा कपूर आणि रणबीर कपूर यांचा चुलत भाऊ अरमान जैनला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले आहेत. टॉप्स ग्रुप घोटाळ्यासंदर्भात अरमानची चौकशी करण्यात येणार आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी पेडर रोड इथल्या अरमानच्या घरी ईडीने धाड टाकली होती. मात्र राजीव कपूर यांच्या निधनामुळे त्यांनी काही तासांतच तपास आटोपता घेतला होता. 

रिमा जैन यांचा मुलगा अरमान हा आईसोबतच दक्षिण मुंबई परिसरात राहतो. राजीव कपूर यांच्या अंत्यविधीला जाण्याची परवानगी त्याला ईडीकडून देण्यात आली. आता चौकशीसाठी त्याला समन्स बजावण्यात आले आहेत. अरमान हा राज कपूर यांचा नातू आहे. 

हेही वाचा : मराठी अभिनेत्रीची आर्थिक मदतीसाठी वणवण; सिद्धिविनायक मंदिराबाहेर करतायत याचना

नेमकं काय आहे प्रकरण?
टॉप्स ग्रुप या खासगी सुरक्षा कंपनी आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित चौकशीसाठी अरमानला समन्स बजावण्यात आले आहेत. प्रताप सरनाईक यांचा पुत्र विहंग याच्याशी अरमानची चांगली मैत्री असल्याचं म्हटलं जातं. टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला १७५ कोटींच्या कंत्रासाठी ७ कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी रमेश नायर यांच्या तक्रारीवरून टॉप्स ग्रुपचे संस्थापक राहुल नंदा यांच्यासह आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याआधी विहंग सरनाईक यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. 
 

loading image