Kareena Kapoor : नारायण मूर्तींनी करिनाविषयी सांगितली 'ती' धक्कादायक गोष्ट!

लोकं मला पाहून देखील माझ्याशी बोलण्यासाठी येत होते. मी त्यांच्याशी उभं राहून बोलत होतो.
Kareena Kapoor Narayana Murthy Video
Kareena Kapoor Narayana Murthy Video esakal

Kareena Kapoor Khan - बॉलीवूडची बेबो म्हणून लोकप्रिय असणाऱ्या करिना कपूरची नेहमीच चर्चा होत असते. आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांसाठी आणि आक्रमक, परखड स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या करिनाचा चाहतावर्ग मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून करिना ही चर्चेत आली आहे. सध्या देशातील प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या एका व्हिडिओनं लक्ष वेधून घेतले आहे.

करिनाविषयी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी त्यांच्या एका व्हिडिओमधून धक्कादायक खुलासा केला आहे. खरं तर तो व्हिडिओ बऱ्याच दिवसांचा आहे. मात्र सोशल मीडियावर तो पुन्हा एकदा ट्रेंड होतो आहे. त्यामुळे त्याची चर्चा सुरु झाली आहे. यावेळी नारायण मूर्ती यांनी करिनाच्या त्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली होती. तर त्यांची पत्नी प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी करिनाची बाजू घेतली होती.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

मूर्ती यांचे म्हणणे होते की, करिनानं तिच्या चाहत्यांसोबत गैरवर्तन केले. त्यांच्याकडून अभिनंदनाचा किंवा शुभेच्छांचा स्विकार करुन त्यांना प्रतिसाद देणे गरजेचे होते. मात्र तिनं तसं केलं नाही. करिना ही मोठी सेलिब्रेटी आहे. आम्ही एकत्र विमानात होतो. त्यावेळी तिला पाहण्यासाठी गर्दी झाली. अशावेळी ती चाहत्यांकडे दुर्लक्ष करत होती. नारायण मूर्ती यांना ही गोष्ट खटकली.

सध्या करिना ही तिच्या कुटूंबासमवेत लंडनमध्ये आहे. गेल्या महिनाभरापासून ती लंडनमध्ये असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. करिनानं काही फोटो देखील सोशल मीडियावर शेयर केल्याचे दिसून आले आहे. अशात नारायण मूर्ती यांचा एक व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून त्यात त्यांनी करिना आपल्या चाहत्यांसोबत कसे वागते हे सांगितले आहे. त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी करिनावर नाराजी व्यक्त केली आहे.

Kareena Kapoor Narayana Murthy Video
Oppenheimer Review : अमेरिका जशी डोक्यावर घेते तशीच ती...! 'ओपनहायमर'ला बोटावर नाचवलं

नारायण मूर्ती म्हणतात की, मी लंडनवरुन भारतात येत होतो. त्यावेळी माझ्या शेजारच्या एका सीटवर करिना देखील बसली होती. तिला पाहून अनेक प्रवासी तिच्याकडे येत, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे. मात्र ती कुणाकडे काहीच लक्ष देत नव्हती. तिनं कुणालाही उत्तरही दिले नव्हते. हे पाहून मला खूप वाईट वाटले.

लोकं मला पाहून देखील माझ्याशी बोलण्यासाठी येत होते. मी त्यांच्याशी उभं राहून बोलत होतो. मी अनेकांना एक ते अर्धा मिनिटं वेळ दिला. पण कुणाला नाराज केले नाही. पण करिनाचे ते वागणे मला आवडले नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुधा मूर्ती यांनी करिनाची बाजूनं बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नेटकऱ्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com