Kareena Kapoor Khan : करिना कपूर रिटायरमेंट घेणार? काय दिलं बेबोनं उत्तर

करिना आता ४३ वर्षांची आहे. यात तिच्या वयावरुन तिला प्रश्न विचारण्यात आले आहे.
Kareena Kapoor Retirement news actress explanation
Kareena Kapoor Retirement news actress explanationesakal

Kareena Kapoor Retirement news actress explanation : करिना कपूर ही सध्या तिच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत आली आहे. करिना ही आता बॉलीवूडपासून निवृत्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सध्या करिनाच्या जाने जानच्या ट्रेलरची हवा आहे. यात करिनानं जे विधान केलं आहे त्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

येत्या २१ सप्टेंबर रोजी करिनाचा जाने जान नावाचा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून त्याची चर्चा आहे. यानिमित्तानं करिनानं जी मुलाखत दिली आहे त्यातून तिनं रिटायरमेंटचे संकेत दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यावरुन आता करिनानं तिची बाजू मांडली आहे. करिना आता ४३ वर्षांची आहे. यात तिच्या वयावरुन तिला प्रश्न विचारण्यात आले आहे.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

जाने जान मध्ये चमकलेल्या करिनानं रिटायरमेंटवर विचारलेल्या प्रश्नावर परखड शब्दांत उत्तर दिलं आहे. त्याची चर्चा सुरु झाली आहे. मला जेव्हा कळेल की आता मला माझ्या कामात उत्साह वाटत नाही त्याच दिवशी मी काम करणं बंद करेल. मी उगाचच काम करत बसणार नाही. तो माझ्या स्वभावाचा भागही नाही. मी प्रत्येक गोष्ट आनंदानं व्यतीत करण्यावर भर देते. ते मला आवडते.

मला मित्रांसोबत राहणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, सतत संवाद साधत राहणे आवडते. तो माझ्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे. मी जशी आहे तशी आहे. मला कुणासाठी बदलणे आवडतही नाही. जे मनात आहे ते बोलून मोकळी होणं हे मला भावते. आणि मी तशीच करते. मला खाण्यापिण्याचा शौक आहे. जेव्हा मला कळेल की मी कामाच्या नादात या सगळ्या गोष्टींपासून लांब चालली तेव्ही मी मोठा निर्णय घेईल. असे करिनानं स्पष्ट केले आहे.

Kareena Kapoor Retirement news actress explanation
Jawan: नाना पाटेकर यांनी जवान, गदर 2 वर साधला निशाणा? म्हणाले, "मी सहन करु शकलो नाही..."

पण माझ्या निवृत्तीची चर्चा का होत आहे हेच मला कळत नाही. अजूनही मला खूप काम करायचे आहे. तुमचे वय ८३ असो किंवा ९३ त्यानं काही फरक पडत नाही. तुमच्यात कामाप्रती किती उत्साह आहे हे महत्वाचे आहे. करिनाच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती यापूर्वी आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढामध्ये दिसली होती. आता ती विजय वर्मा सोबत जाने जानमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती येत्या काळात हंसल मेहता यांच्या द बकिंगहॅम मर्डर्समध्येही दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com