..तेव्हा कपूर कुटुंबानेही आईकडे पाठ फिरवली होती- करीना कपूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kareena Karisma Babita

..तेव्हा कपूर कुटुंबानेही आईकडे पाठ फिरवली होती- करीना कपूर

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये करीना कपूरचं Kareena Kapoor नाव आवर्जून घेतलं जातं. करीनाला बहीण करिश्मापेक्षा Karisma जास्त प्रसिद्धी मिळाली. या दोघींचं संगोपन आई बबिता कपूर यांनी एकटीने केलं. २००७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत करीनाने सांगितलं होतं की, लहानाचं मोठं होताना ती आणि करिश्मा वडील रणधीर कपूर Randhir Kapoor यांना फार भेटले नव्हते. इतकंच काय तर कपूर कुटुंबीयांकडून बबिता यांना आर्थिक मदतही न मिळाल्याचं तिने सांगितलं होतं.

करिश्मा बॉलिवूडमध्ये स्टार होण्याआधी आर्थिक परिस्थिती कशी होती, याबद्दल करीनाने 'मुंबई मिरर'ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. 'आई सतत काही ना काही कामं करायची. तिने एकटीने आम्हाला लहानाचं मोठं केलं. रिअल इस्टेटचं काम होतंच पण त्याशिवाय ती इतरही लहानसहान कामं करायची. परिस्थिती फार कठीण होती. आम्हाला एकटं सोडलं होतं. लहान असताना आम्ही वडिलांना फार भेटू शकलो नव्हतो. पण आता आम्ही अनेकदा भेटतो, एक कुटुंब म्हणून वावरतो.'

रणधीर आणि बबिता यांनी ६ नोव्हेंबर १९७१ रोजी लग्न केलं. 'कल आज और कल' या करिअरमधील पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र १९८८ मध्ये रणधीर कपूर हे पत्नी आणि मुलींपासून वेगळे आपल्या आई-वडिलांसोबत राहू लागले.

रणधीर आणि बबिता हे वेगवेगळे राहत असले तरी त्या दोघांनी घटस्फोट कधीच घेतला नाही. बबिता, करीना आणि करिश्माच्या जवळ राहण्यासाटी मुंबईतील चेंबूर इथलं वडिलोपार्जित घर विकण्याचा विचार असल्याचं रणधीर यांनी नुकतंच सांगितलं होतं.

हेही वाचा: गरोदरपणातील शरीरसंबंधाच्या विषयावर करीना कपूरने मांडलं तिचं मत

हेही वाचा: "तुम्हाला थोडीसुद्धा अक्कल नाही का?", घटस्फोटाविषयी विचारताच समंथा भडकली

करीनाने सैफ अली खानशी लग्न केलं. या दोघांना चार वर्षांचा तैमुर हा मुलगा असून याच वर्षी फेब्रुवारीत करीनाने आणखी एका मुलाला जन्म दिला. दुसऱ्या मुलाचं नाव त्यांनी जहांगीर असं ठेवलं. करीना लवकरच आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात झळकणार आहे. 'सिक्रेट सुपरस्टार' चित्रपटाचा दिग्दर्शक अद्वैत चंदनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'फॉरेस्ट गम्प' या हॉलिवूड चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.

loading image
go to top