esakal | करीना, कियारा डिसेंबरमध्ये देणार 'गुड न्यूज'
sakal

बोलून बातमी शोधा

Kiara Advani and kareena kapoor khan

Good news movie : करीना आणि कियारा अडवाणी डिसेंबरमध्ये 'गुड न्यूज' देणार आहेत. याचा पहिला पोस्टर एकदा पाहाच !

करीना, कियारा डिसेंबरमध्ये देणार 'गुड न्यूज'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या करीना कपूर खान आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांचा आगामी सिनेमाचा पहिला पोस्टर रिलिज झाला आहे. 'गुड न्यूज' असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा पहिला पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये झळकणारी करीना आणि कियारा अडवाणी डिसेंबरमध्ये 'गुड न्यूज' देणार आहेत. याचा पहिला पोस्टर एकदा पाहाच !

अक्षयने त्याच्या ट्विटरवर अकाउंटवर हा पोस्टर शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रेगनंट करीना आणि कियारा बेबी बंप दाखवताना दिसत आहेत. या दोघींच्यामध्ये अक्षय कुमार आणि दिलजित दोसांज फसलेला दिसत आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरुन हा चित्रपट नक्कीच कॉमेडीची मेजवानी असणार आहे हे स्पष्ट होत आहे. शिवाय कियारा अडवाणी कलंक आणि कबीर सिंग या बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांतून झळकली होती. अक्षय, करीना, कियारा आणि गायक दिलजित पहिल्यांदाच ही कास्ट एकत्र झळकणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर उद्या रिलिज होणार आहे.

करीना कपूर अभिनेता इरफान खानसोबत 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटामध्ये करीना आणि सैफचा मुलगा आणि इंटरनेट सेंसेशन तैमुरही झळकणार असल्याची चर्चा बि-टाउनमध्ये आहे. काही मिनिटांसाठी तैमुर यामध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटासाठी अधिक उत्सुकता पाहायला मिळतेय. 

गायक आणि अभिनेता दिलजित दोसांज याआधी पंजाबी सिनेंमांमधून दिसला आहे. बॉलिवूडमध्ये सिंग इज ब्लिंग, फिलॉरी, उडता पंजाब असे काही सुपरहिट चित्रपट त्याने केले. आता तो 'गूड न्यूज' च्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 

कियाराचा कबीर सिंगमधील अभिनय प्रेक्षकांना खूपच भावला आणि तिला भरपूर पसंती मिळाली. कियाराने नेटफ्लिक्सच्या 'लस्ट स्टोरी' या चित्रपटातून काम केलं आणि त्यातील तिच्या अभिनयाची प्रशंसा करण्यात आली. त्यामध्ये ती अभिनेता विकी कौशलसोबत दिसली होती. 

9 वर्षांनतर एकत्र दिसणार करीना आणि अक्षय
खिलाडी कुमार आणि बेबो मुख्य भूमिकेत 'गुड न्यूज' सिनेमातून दिसणार आहेत. याआधी हे दोघ 2009 मध्ये आलेल्या 'कमबख्त इश्क' या चित्रपटातून एकत्र दिसले होते. त्यानंतर  'गुड न्यूज' च्या निमित्ताने बेबो आणि अक्षय 9 वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. धर्मा प्रोडक्शन या सिनेमाचं निर्देशन करीत आहे. चित्रपटाची कधा 'सरोगसी' वर आधारीत असणार आहे. याआधी 2002 मध्ये याच विषयावर मेघना गुलजार यांनी ' फिलहाल' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 
 

loading image