'ते चिअर अप नव्हे टर उडवत होते',साराचा व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूडची अभिनेत्री सारा अली खान (sara ali khan) ही तिच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहे.
sara ali khan
sara ali khan Team esakal
Updated on

मुंबई - बॉलीवूडची अभिनेत्री सारा अली खान (sara ali khan) ही तिच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहे. तसेच ती नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. आगामी काळात तिचे अनेक महत्वाचे प्रोजेक्ट सुरु होणार आहेत. ज्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सध्या सारा अली खान ही तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. त्यात तिची कार्तिक आर्यन आणि इब्राहीम खाननं (ibrahim khan) टर उडवली आहे. तिचा तो व्हिडिओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. व्हिडिओला मोठ्या प्रमाणात चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. (kartik aaryan and ibrahim ali khan cheering sara ali khan video goes viral in social media yst88)

कार्तिक आर्यन(karthik aryan) आणि सारा अली खानचा लव आज कल 2 हा प्रेक्षकांना कमालीचा भावला होता. त्यात त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्याविषयी वेगळी चर्चा बॉलीवूडमध्ये सुरु आहे. त्या दोघांना अनेकदा एकत्र असताना स्पॉट केले गेले आहे. मात्र जेव्हा त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या दोघांच्याही चाहत्यांना धक्का बसला होता.

आता कार्तिक आणि सारा अली खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतो आहे. त्यात साराचा भाऊ इब्राहीम दिसतो आहे. इंस्टावर सारतीकियन्स 12 नावाच्या एका अकाउंटवरुन हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यात आपण पाहू शकतो की, सारा अली खान ही एका शो मध्ये गेली होती. त्यावेळी समोर प्रेक्षकांमध्ये कार्तिक आर्यन आणि तिचा भाऊ इब्राहीम खान बसलेले दिसले. ते दोघेही साराला चियर करण्यासाठी बसले होते. मात्र ते केवळ साराला चियर्स करत नव्हते तर ते तिला चिडवतही होते.

sara ali khan
राज कुंद्रा प्रकरणात शिल्पाला 'क्लीन चिट' नाहीच
sara ali khan
मला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं, शिल्पाचा खुलासा

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याला आतापर्यत 31 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. त्या व्हिडिओला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळाला आहे. चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया त्या व्हिडिओवर दिल्या आहेत. सध्या साजिद नाडियावाला सारा आणि कार्तिकला घेऊन एक चित्रपट करत आहेत. मात्र अजून त्याचा खुलासा करण्यात आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com