Kartik Aaryan: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच कार्तिक आणि सारा एकत्र झाले स्पॉट, चाहते म्हणाले- 'सारा तू जास्तच...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kartik aaryan and sara ali khan

Kartik Aaryan: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच कार्तिक आणि सारा एकत्र झाले स्पॉट, चाहते म्हणाले- 'सारा तू जास्तच...'

'शहजादा' अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या डेटींगच्या अनेक अफवा पसरल्या होत्या. लव आज कलच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आल्याचे बोलले जात आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर दोघे वेगळे झाले.

पुन्हा एकदा दोघंही एकत्र बोलताना आणि हसताना दिसले. त्याचबरोबर या दोघांना एकत्र पाहून चाहते खूप खूश आहेत.

कार्तिकच्या काही फॅन पेजने फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कार्तिक आणि सारा एकमेकांसोबत बोलताना आणि हसताना दिसत आहेत. फोटोत, कार्तिक निळा आणि पांढरा चेक शर्ट आणि सनग्लासेस घातलेला दिसत आहे, तर सारा काळ्या कलरची शॉर्ट्स आणि पांढरा सैल क्रॉप टॉपमध्ये आकर्षक दिसत आहे.

व्हॅलेंटाईन डे आठवड्यात प्रपोज डेवर कार्तिक आणि साराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि चाहते त्यांची प्रेमाने भरलेली केमिस्ट्री पाहून आनंदित झाले आहेत. कार्तिक आणि सारा यांनी त्यांच्यातील मतभेद दूर करावेत आणि पुन्हा एकत्र यावे, अशीही चाहत्यांची अपेक्षा आहे. एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने कमेंट केली, "सारा यावेळी जास्त प्रेमात आहे असे दिसते."

गेल्या वर्षी करण जोहरने कॉफी विथ करण 7 वर पुष्टी केली होती की कार्तिक आणि सारा खरोखरच थोड्या काळासाठी एकमेकांना डेट करत होते. नंतर जेव्हा कार्तिकला त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने एका मुलाखतीत सांगितले की तो सिंगल आहे.