'RRR'सिनेमाशी 'भूलभूलैय्या 2'ची टक्कर टळली; नवीन तारीख जाहिर...Kartik Aaryan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan In 'Bhool Bhulaiyaa' Poster

'RRR' सिनेमाशी 'भूलभूलैय्या 2' ची टक्कर टळली; नवीन तारीख जाहिर...

एस.एस.राजामौली(S.S.Rajamouli) यांचा 'RRR' सिनेमा 25 मार्चला प्रदर्शित होणार हे जाहिर होताच कार्तिक आर्यनच्या(Kartik Aaryan) 'भूल भूलैय्या 2' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख आता पुढे ढकलण्यात आली आहे. ज्यामुळे मार्च महिन्यात बॉक्स ऑफिस कलेक्शनवर पहायला मिळणारं घुमशान युद्ध टळल्याचं बोललं जात आहे. कार्तिक आर्यनचा सिनेमा आता 20 मे ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'भूल भूलैय्या 2' हा एका सायकॉलॉजिकल कॉमेडी थ्रिलर आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनिस बझमी यांनी केलं आहे. या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत कियारा अडवाणी आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाची कथा फरहाद सामजी आणि आकाश कौशिक यांनी लिहिली आहे. 'भूल भूलैय्या 2' ची निर्मिती भूषण कुमार,मुराद खेतानी आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे. कार्तिकचा हा सिनेमा विद्या बालन आणि अक्षय कुमार यांच्या 'भूल भूलैय्या' या हिट सिनेमाचा सीक्वेल आहे. या सिनेमाचं शूटिंग लॉकडाऊन दरम्यानच करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा: Good News:नागराज मंजुळेचा 'झुंड' सिनेमागृहात;या तारखेला प्रदर्शित

'भूल भूलैय्या' 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्या सिनेमाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं होतं. या सिनेमाला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं होतं. विद्या बालनने या सिनेमात अवनी चुतुर्वेदीची भूमिका केली होती. जिच्यामध्ये मोंजुलिका या एका नर्तकीचा आत्मा प्रवेश करतो आणि पुढे घडणारा सगळा ड्रामा सिनेमातला खूपच इंट्रेस्टिंग भाग होता. या सिनेमात अक्षय कुमारने मानसोपचार तज्ञाची भूमिका साकारली होती. सुरुवातीला 'भूल भूलैय्या 2' हा सिनेमा गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार,अशी घोषणा खूप आधी करण्यात आली होती. पण तेव्हा कार्तिकने सिनेमाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. आणि त्या माध्यमातून सिनेमातला आपला लूकही समोर आणला होता. तसंच सिनेमा 25 मार्चला प्रदर्शित होईल असे जाहिर केले होते.

हेही वाचा: 'या' अभिनेत्याने सैफला दिला होता करिनाशी लग्न न करण्याचा सल्ला

या वर्षातला हा कार्तिकचा प्रदर्शित होणारा पहिला सिनेमा आहे. याआधी गेल्या वर्षाच्या शेवटी-शेवटी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या कार्तिकच्या 'धमाका' सिनेमाला खूप पसंत केले गेले होते. कार्तिक आता जवळजवळ दोन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर 'भूल भूलैय्या 2' सिनेमाच्या माध्यमातून दिसणार आहे. सध्या कार्तिक 'शहजादा','कॅप्टन इंडिया' आणि 'फ्रेडी' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 'शहजादा' आणि 'कॅप्टन इंडिया' हे त्याचे सिनेमे याच वर्षात प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे.

Web Title: Kartik Aaryan Bhool Bhulaiyaa 2 Release Date Change Entertertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top